Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

जाणून घ्या ऑनलाइन तिकीट बुकिंग आरक्षित व रद्द करण्याचे महत्वाचे नियम

जाणून घ्या ऑनलाइन तिकीट बुकिंग आरक्षित व रद्द करण्याचे महत्वाचे नियम

आजकाल आपल्यापैकी बरेच जण रेल्वे तिकीट ऑनलाइन बुक करणं पसंद करतात. पण बऱ्याचदा मनात एक प्रश्न डोकावतो की तिकीट तर बुक केलंय पण जर ते रद्द करायचं असेल तर ते कसं करावं. चला आज आमची टीम महाराष्ट्र वार्ता आपल्याला ऑनलाइन तिकीट आरक्षित व रद्द करण्याचे नियम सांगणार आहे. आयआरसीटीसी(IRCTC) चे संकेतस्थळ www.irctc.co.in च्या अनुसार, प्रवासी सर्व श्रेणींसाठी व ट्रेन साठी १२० दिवस आधी पर्यंत तिकीट बुक करु शकतात. IRCTC ने वरिष्ठ नागरिक, दिव्यांग व पत्रकारांना सवलतीच्या दरात तिकीट बुक करण्याची सोय उपलब्ध केली आहे.

जर तुम्ही कोणत्याही परिस्थितीत ट्रेन चा चार्ट तयार होण्यापूर्वी तिकीट रद्द केलंत तर विशिष्ट शुल्क कापून बाकीची रक्कम तुमच्या खात्यात जमा होते ज्या खात्यातून तुम्ही बुकिंगसाठी पैसे दिलेत.

हे आहेत तिकीट आरक्षित व रद्द करण्याचे नियम

  1. IRCTC च्या संकेतस्थळानुसार एक जण फक्त सहा लोकांसाठी तिकीट बुक करू शकतो. यासाठी विशेषतः सर्व तिकिटांवर प्रवास सुरु करण्याचं एकच स्थानक व एकच ट्रेन असावी.
  2. प्रत्येक श्रेणीतील बुकिंग साठी आरक्षण शुल्क भिन्न आहे. भारतीय रेल्वे ची वेबसाईट indianrailways.gov.in नुसार आरक्षण शुल्क, सुपरफास्ट चार्ज, नंबर कॅटरिंग चार्ज आणि जीएसटी सारखे शुल्क हे आधार/base rate वर अतिरिक्त लावले जातात.
  3. आरक्षण कन्फर्म असलेल्या प्रवाश्यांना बर्थ दिली जाते, त्यांच्या तिकिटावर कोच(डब्बा) व बर्थ क्रमांक लिहिलेला आसतो.
  4. वरिष्ठ नागरिकांना तिकीट दरात सवलत दिली जाते. ज्यात पुरुषांना ४०% आणि महिलांना ५०% पर्यंत सवलत मिळते. यासाठी वय ६० पेक्षा जास्त असणं गरजेचं आहे.
  5. ट्रेन चा चार्ट तयार होण्यापूर्वी पर्यंतच प्रवासी त्यांचे आरक्षण (ई-तिकीट) रद्द करू शकतात.
  6. जर ट्रेन च्या प्रस्थानापूर्वी ४८ तास आधी कन्फर्म तिकीट रद्द केलं, तर रद्द करण्याचे शुल्क AC प्रथम श्रेणी/Executive साठी ₹२४०(प्रति प्रवासी), AC 2 टियर – ₹२००, AC 3 टियर/AC चेअर कार/ AC 3 इकॉनॉमी -₹१८० आहे. तर स्लीपर क्लास व द्वितीय श्रेणीसाठी अनुक्रमे ₹६० आहे.
  7. जर ट्रेन सुटण्यापूर्वी ४८ तास आधी तसेच तिकीट बुक झाल्यानंतरच्या १२ तासाच्या आत रद्द केलं, तर मूलभूत भाड्याच्या २५ टक्के रक्कम तिकीट रद्द करण्याची शुल्क म्हणून आकारली जाते.
  8. ट्रेन सुटण्याच्या वेळेआधी चार्ट बनण्यापूर्वी जर तिकीट रद्द केले तर ५० टक्के रक्कम रद्द शुल्क म्हणून लागू होते.
  9. चार्ट तयार झाल्यानंतर, प्रवासी ऑनलाइन टीडीआर (तिकीट डिपॉझिट रिसिप्ट) फायलिंग सुविधेचा वापर करू शकतात आणि रिफंड मिळवण्याच्या प्रक्रियेची स्थिती ऑनलाइन चेक करू शकतात.

शेअर करा …Like करा ….कॅमेन्ट करा

(वरील सर्व माहिती ही भारतीय रेल्वे च्या संकेतस्थळांवरून घेण्यात आली आहे. काही प्रश्न असतील तर आपण थेट संकेत स्थळाला भेट देऊ शकता)

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *