Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

ओडिशा रेल्वे अपघाताचे ताजे तपशील जाणून घ्या

ओडिशा रेल्वे अपघाताचे ताजे तपशील जाणून घ्या

ओडिशा, दि. 3: ओदिशातल्या बालासोर इथल्या बहानगा रेल्वे स्थानकावर काल झालेल्या अपघातातल्या मृतांची संख्या वाढून 280 झाली आहे तर 900 गंभीर जखमी झाले आहेत, असं रेल्वेनं आपल्या ताज्या आकडेवारीत म्हटलं आहे. बचाव कार्य पूर्ण झाल्याची माहिती दक्षिण पूर्व रेल्वे विभागानं दिली आहे. मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे, ओळख पटलेले मृतदेह संबंधित नातेवाईकांकडे सोपवण्यात आले आहेत, अशी माहिती ओदिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनी दिली आहे.

काल संध्याकाळी सातच्या सुमाराला शालिमार-हावडा कोरोमंडल एक्सप्रेस बहानगा रेल्वेस्थानकावर एका मालगाडीला आदळल्यानंतर रुळांवरून घसरली. काहीच मिनिटांच्या अंतरानं आणि बंगळुरू-हावडा एक्सप्रेस रेल्वे गडी याच ठिकाणी घसरल्यामुळं हा अपघात झाल्याचं खरगपूरच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी सांगितलं. मृतांच्या वारसांना दहा लाख रुपये, गंभीर जखमींना दोन लाख रुपये तर किरकोळ जखमींना पन्नास हजार रुपये मदत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केली आहे. वैष्णव यांनी आज परिस्थितीचा आढावा घेतला. या अपघाताची सविस्तरपणे उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, असं त्यांनी सांगितलं. तसंच रेल्वे सुरक्षा आयुक्ततही स्वतंत्रपणे चौकशी करतील असं त्या म्हणाल्या. गेल्या पंधरा वर्षातला हा सगळ्यात भीषण अपघात असून चौकशी नंतरच त्यामागचं निश्चित कारण समजेल, असं त्यांनी सांगितलं.
प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या वारसांना दोन लाख रुपयांची मदत प्रधानमंत्र्यां नी जाहीर केली आहे तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रूपयांची मदत दिली जाणार आहे. केंद्र सरकारनं एम्सच्या डॉक्टरांची दोन पथकं घटनास्थळी रवाना केल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितलं. आवश्यक ती सर्व मदत सरकार करत असल्याचं त्यांनी सांगितलं.

ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी आज सकाळी घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली.  त्यांनी बालासोर जिल्हा रूग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.

दरम्यान अपघातग्रस्त कोरोमंडल एक्स्प्रेसमधे अडकलेल्या अडीचशे प्रवाशांनी घेऊन एक विशेष रेल्वेगाडी आज भद्रकहून चेन्नईकडे रवाना झाली. ही गाडी उद्या चेन्नईला पोहोचेल. काल झालेल्या अपघातामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

Source – AIR

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *