Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

नितीन नांदगावकर यांनी ‘हिरानंदानी हॉस्पिटल’ ला दिलेल्या ‘थप्पड की गूंज’ गेली सातासमुद्रापार

कालच्या व्हिडिओमुळे नांदगावकरांवर होतोय देशभरातून कौतुकाचा वर्षाव; २४ तासांत आल्या २२ हजार प्रतिक्रिया

मुंबई/ऑस्ट्रेलिया दि.१७ : सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ऑफिसच्या मोबाईलची बेल वाजली. +61 ने सुरू होणारा आंतरराष्ट्रीय क्रमांक स्क्रीन वर दिसत होता. फोन उचलला तशी समोरची व्यक्ती थेट संभाषण सुरू करत म्हणाली, “मी अजय देशमुख, मूळचा पुण्याचा आता ऑस्ट्रेलियाहून बोलतोय. मला नितीन नांदगावकरांशी बोलायचं आहे. काल मी महाराष्ट्र वार्ता वरची तुमची बातमी पाहिली. मुंबईतल्या हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये त्यांनी त्या रिक्षावाल्याला ज्या प्रकारे न्याय मिळवून दिला त्यामुळे मला न रहावून त्यांचं कौतुक करावसं वाटतंय. त्यांनी पुण्यातही अशी एक मोहीम करावी असे अजय पुढे म्हणाले.” देशमुख यांना आम्ही आश्वस्त केलं की तुमच्या शुभेच्छा आम्ही नितीन नांदगावकर यांच्या पर्यंत थेट कॉल करूनच पोहोचवू. साता समुद्रापार नोकरी-व्यावसाया निमित्त राहणाऱ्या अजय देशमुख यांच्यासारख्या मराठी माणसालाही देशात सध्या कोरोनाच्या महामारीच्या काळात रुग्णालयांकडून चाललेली लूट पाहवत नाहीये हे विशेष.

काल शिवसेनेच्या नितीन नांदगावकर यांनी मुंबईतील हिरानंदानी रुग्णालयाला दणका देत एका रिक्षावाल्याच्या मृत नातेवाईकाचे कोरोना उपचारापोटी झालेले ८ लाख रुपये माफ केले. यावेळी येथील डॉक्टरांनी सुरुवातीला काहीशी अरेरावीची भूमिका घेतल्यामुळे नितीन नांदगावकरांचा पारा चढला आणि अखेर त्यांच हे रौद्ररूप पाहून या ज्येष्ठ डॉक्टर महाशयांनी आपली शस्त्र म्यान केली व सगळेच्या सगळे ८ लाख रुपये माफ करतो पण शांत व्हा असे म्हणत सपशेल नांगी टाकली. काल या घटनेचे व्हिडिओ देशभर व अगदी जगभर व्हायरल झाले. या व्हिडिओला गेल्या चोविस तासांत जवळपास ४८ लाख लोकांकडून पाहिलं गेलंय, तर याचे ४६ हजार शेअर्स झाले आहेत. याच सोबत १ लाख ४२ हजार जणांनी या व्हिडिओवर रिऍक्ट तर आतापर्यंत देशभरातील जवळपास सर्व राज्यांतल्या २२ हजार जणांनी कमेंट केलेल्या आपल्याला पाहायला मिळू शकतात.

यात एक वैशिष्ट्य म्हणजे नांदगावकर यांना ज्या कमेंट त्यांच्या फेसबुक पेज वर आलेल्या आहेत त्यात जवळपास सगळ्यांनी त्यांच्या कामाची व प्रामाणिक प्रयत्नांची दिलखुलास प्रशंसा केली आहे. काहींच असंही म्हणणं की आमच्या राज्यात तुमच्यासारखं काम करणारं कोणी आद्यप नाहीये. महाराष्ट्रातील माणसं खरंच नशिबवान आहेत. अनेकांचं म्हणणं असं होतं की शिवसेना सत्तेत असतानाही तुम्हाला असं रस्त्यावर येऊन का भांडावं लागतंय. पण यावरही प्रत्युत्तरादाखल अनेकांनी म्हटलं की सरकारी यंत्रणा ही सरळ करण्यासाठी सत्ताधाऱ्यांपेक्षा नितीन नांदगावकर यांच्या सारख्या बेडर माणसाची गरज आहे.

कालच्या हिरानंदानी रुग्णालयातील प्रसंगामुळे मुंबई-पुण्यातील लुटारू डॉक्टर व रुग्णालयांच्या मनात शिवसेनेच्या नांदगावकर यांच्याबद्दल विलक्षण दहशत निर्माण झालीय इतकं मात्र नक्की.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *