Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

बीसीजी लसीकरणासाठी नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य कर्मचा-यांचे प्रशिक्षण संपन्न

क्षयरोग निर्मूलन लसीकरण अभियान

नागपूर, दि. २३: नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाअंतर्गत टीबी विषयक १८ वर्षावरील वयोगटातील वर्गांसाठी बीसीजी लसीकरणाबाबत आरोग्य कर्मचा-यांचे प्रशिक्षण २० व २१ मार्च रोजी महाल येथील टाउन हॉलमध्ये पार पडले. या लसीकरण अभियानात राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानातील नागरी आरोग्य केंद्र, मनपाचे सर्व दवाखाने, हेल्थ पोस्ट, आरोग्य वर्धिनी केंद्र यांच्या अंतर्गत येणारे वैद्यकिय अधिकारी जीएनएम, एएनएम, लसीकरण नियंत्रक या सर्वांना प्रशिक्षण देण्यात आले.

मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनात व वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांच्या नेतृत्वात हे प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आले. केंद्र सरकाराद्वारे क्षयमुक्त भारत अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाअंतर्गत संपूर्ण भारतात राष्ट्रीय क्षयरोग दुरीकण कार्यक्रम कक्ष व आयसीएमआर च्या संयुक्त विद्यमानाने ‘अडल्ट बीसीजी व्हॅक्सिनेशन कॅम्पेन’ राबविण्यात येत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ४० जिल्हयात हा प्रकल्प राबविण्यात येत असून राज्यभरात अंदाजे १.२ कोटी नागरिकांचे लसीकरण अपेक्षित आहे. या प्रकल्पाकरीता महाराष्ट्रातून नागपूर मनपाची निवड करण्यात आली आहे. क्षयरोग निर्मुलन लसीकरण अभियानाअंतर्गत १८ वर्षावरील व्यक्तींना व शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार पात्र व्यक्तींना लस देण्यात येणार आहे. त्यामध्ये मागील पाच वर्षात क्षयरोग झालेले, ६० वर्षावरील व्यक्ती, धुम्रपान करणारे व्यक्ती, क्षयरुग्णांच्या सानिध्यातील व्यक्ती, मधुमेह असलेले व्यक्ती, ज्यांचा बीएमआय १८ पेक्षा कमी आहे, कुपोषित, प्रौढ व्यक्ती असे व्यक्ती या लसीकरणाचे लाभार्थी राहणार आहेत.

सदर लसीकरण हे मे २०२४ मध्ये चालू होणार आहे. त्याअगोदर १ एप्रिल २०२४ पासून मनपाच्या आरोग्य केंद्राअंतर्गत आरोग्य स्वयंसेवकेच्या कार्यक्षेत्रातील मार्गदर्शक सुचनेप्रमाणे संबंधित गटाचे पात्र लाभार्थ्यांची यादी बनविण्याकरीता १ एप्रिल २०२०४ पासून सर्वेक्षण मोहिम सुरू होत आहे व त्यानंतर १ मे २०२४ पासून संबंधित १८ वर्षावरील वयोगटातील लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. शासनाच्या या लसीकरण मोहिमेकरीता महानगरपालिकेतील सर्व वैद्यकीय अधिकारी, एएनएम, जीएनएम, संबंधित कर्मचारी यांचे प्रशिक्षण घेण्यात आले आहे. या प्रशिक्षणामध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या नागपूर विभाग सल्लागार डॉ. स्वर्णा रामटेके, जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. साजिद खान, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. शिल्पा जिचकार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आरोग्य व एनयूएचएम समन्वयक दिपाली नागरे, क्षयरोग विभागाचे समन्वयक श्री. मधुमटके, पीपीएम समन्वयक संगिता शिंगणे आदी उपस्थित होते.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *