Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

मुंबई आणि परिसरात फक्त पाऊस …पाऊस …आणि फक्त पाऊस

मुंबई आणि परिसरात फक्त पाऊस …पाऊस …आणि फक्त पाऊस


मुंबई: गेल्या चोवीस तासांपासून अविरत कोसळणाऱ्या पावसाने आजही विश्रांती घेण्याची शक्यता धूसर वाटते. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पनवेल-रायगड परिसरात पहाटेपासून पावसाची संततधार चालू आहे. अनेक भागांत पाणी साचले असून, काही ठिकाणी वीजपुरवठाही खंडित करण्यात आलेला आहे. ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे रस्ते वाहतुकीचेही तीन तेरा वाजले आहेत.

मागील २४ तासात मुंबई व मुंबई उपनगरात अनुक्रमे ५० ते १०० व १५० ते १८० मिमी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. मुंबई व परिसरातील काही भागात येत्या २४ तासात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबई महानगरपालिकेनेही या संदर्भात एक विशेष ट्विट करत नागरिकांना सावध केले आहे. शालेय शिक्षण मंत्री आशीष शेलार यांनी ही शाळांना सुट्टी देण्याचे मुख्याध्यापकांना अधिकार दिले आहेत.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *