म्हाडा व शिवसेनेतर्फे सिंधुदुर्गवासीय गिरणी कामगारांसाठी लॉटरी प्रक्रियापूर्व मार्गदर्शन शिबीराचे आयोजन
कुडाळ: राज्य सरकारने म्हाडामार्फत मुंबईत घरांचे प्रकल्प प्रस्तावित केले आहेत. ज्यात गिरणी कामगारांसाठी म्हाडाची ५०९० घरांची लॉटरी प्रस्तावित आहे. सिंधुदुर्गवासिय गिरणी कामगारांची संख्या जास्त असल्याने लॉटरीत कसे सहभागी व्हायचे, कोण अर्ज करू शकतात, कोणती कागदपत्र हवी अशा अनेक शंका व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी म्हाडाचे अधिकारी आणि गिरणी कामगारांची बैठक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे २८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. यानिमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गिरणी कामगारांनी बैठकीला उपस्थित राहावे असे आवाहन म्हाडाचे अध्यक्ष आमदार उदय सामंत यांनी केले आहे.
या बैठकीला रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री पालक मंत्री दीपक केसरकर व शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख आमदार वैभव नाईक यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
बैठकीचे स्थळ : महालक्ष्मी मंगल कार्यालय कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग.