Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

जागतिक पर्यटन दिनानिमित्त एमटीडीसीमार्फत दि. २३ ते २९ सप्टेंबरदरम्यान विविध उपक्रम

जागतिक पर्यटन दिनानिमित्त एमटीडीसीमार्फत दि. २३ ते २९ सप्टेंबरदरम्यान विविध उपक्रम

मुंबईदि. २५ : जागतिक पर्यटन दिन हा पर्यटन मंत्रालय भारत सरकार, महाराष्ट्र राज्य पर्यटन विभाग यांच्याद्वारे विविध उपक्रमांतून साजरा केला जातो. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) यावर्षीही २७ सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिन साजरा करत असून यानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. युनायटेड नेशन वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन (UNWTO) द्वारे सन २०२२ करिता जागतिक पर्यटन दिनाचे घोषवाक्य ‘पुनर्विचारात्मक पर्यटन’ (Rethinking Tourism) हे घोषित करण्यात आले आहे.

या वर्षी इंडोनेशियातील बाली येथे २७ सप्टेंबर रोजी अधिकृत जागतिक पर्यटन दिन साजरा केला जाईल, जो विकासाचा महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पर्यटनाकडे वळवला जाणार आहे. जागतिक पर्यटन दिनाच्या घोषवाक्यानुसार आपण पर्यटन कसे करतो याचा फेरविचार करण्याची हीच योग्य वेळ आहे.

एमटीडीसीच्या प्रधान कार्यालयासमवेत महामंडळ स्वत: परिचलन करत असलेल्या सर्व प्रादेशिक कार्यालये, सर्व पर्यटक निवासे, उपहारगृहे, बोट क्लब्स, माहिती केंद्रे, कलाग्राम इ. ठिकाणी जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधत दि. २३ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर २०२२ या कालावधीत पर्यटनाशी निगडीत विविध उपक्रमांची अंमलबजावणी करत ‘पर्यटन सप्ताह’ साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये नजिकच्या नामवंत सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक संस्था, महाविद्यालये, शाळा, पुरातत्व विभाग आदींच्या सर्वसमावेशक योगदानातून हा पर्यटन सप्ताह विविध आकर्षक उपक्रमांची अंमलबजावणी करत उत्स्फूर्तपणे साजरा करण्यात येत आहे.

पर्यटक निवासात वास्तव्य येणाऱ्या पर्यटकांचे विमानतळ, बस स्थानक, रेल्वे स्टेशन अशा ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येईल. पर्यटक निवासामध्ये या दिवशी येणाऱ्या पर्यटकांसाठी विविध स्पर्धा तसेच पारंपरिक खेळाचे आयोजन असेल. सर्व उपहारगृहामध्ये त्या त्या भागातील स्थानिक प्रसिद्ध असलेले विशेष पदार्थ तयार करण्यात येणार असून त्याबाबत उपहारगृहाच्या प्रवेशद्वारावर पर्यटकांना सूचना फलकाद्वारे अवगत करण्यात येणार आहे. पर्यटकांकरिता अनुभवात्मक पर्यटनाची सांगड घालताना वास्तव्यास आलेल्या अतिथी पर्यटकांना निवासाभोवताली असलेल्या नजिकच्या सुरक्षित – पर्यावरण पूरक ठिकाणी ट्रेक, जंगल ट्रेल, नॅचरल वॉक इ. चा मनमुराद आस्वाद पर्यटकांना देण्यात येणार आहे.

‘पर्यटनावर पुनर्विचार’ या विषयावर विविध स्पर्धा, व्याख्यानमाला, कलेतून प्रबोधन आदींचे आयोजन करण्यात येणार आहे.

महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज यांच्या निर्देशानुसार आणि महाव्यवस्थापक चंदशेखर जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली ‘पर्यटन सप्ताह’ हा पर्यटनाशी पुरेपूर निगडित राहील व आयोजित होत असलेल्या उपक्रमांद्वारे पर्यटनवाढ वृद्धिंगत होण्यास हातभार लागेल, या दृष्टीने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून पर्यटन दिन साजरा करण्यात येणार आहे. ऐतिहासिक स्थळी पदयात्रांचे आयोजन, छोट्या मॅरथॉन, गायन व वादनाचे कार्यक्रम, ग्रामीण भागांचे दर्शन, शालेय मुलांसाठी विविध उपक्रम, जबाबदार आणि पर्यावरणपूरक पर्यटनाच्या अंतर्गत जंगल आणि शेती येथे पदभ्रमंती असे उपक्रम  राबविण्यात येणार आहेत. या  निमित्ताने पर्यटन राजधानी औरंगाबाद येथे एमटीडीसी, विनीत फाउंडेशन आणि औरंगाबाद Ploggers यांच्या संयुक्त विद्यमाने मायक्रोप्लास्टिक प्लॉगिंग (Microplastic Plogging) या नाविण्यपूर्ण उपक्रमासोबतच २७ सप्टेंबर २०२२ रोजी सायक्लोथॉन चे आयोजन करण्यात आले आहे.

पर्यावरणासाठी पूरक असे स्वच्छता अभियान, समुद्रकिनारा सफाई, हस्तकला, गडभ्रमंती असे उपक्रम सर्वत्र राबविण्यात येत आहेत. पर्यटनाचा पुनर्विचार करताना पर्यावरण आणि जबाबदार पर्यटनाची सांगड घालण्यात येणार आहे. पर्यटकांनी या उपक्रमांमध्ये भाग घेऊन पर्यटनाचा आनंद घ्यावा, तसेच पर्यावरण रक्षणामध्ये आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन एमटीडीसीचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी केले आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *