Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

१८ व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव – मिफ्फ मध्ये एन.एफ.डी.सी. घेणार ॲनिमेशनविषयक विशेष कार्यशाळा

१८ व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव – मिफ्फ मध्ये एन.एफ.डी.सी. घेणार ॲनिमेशनविषयक विशेष कार्यशाळा

मुंबई, दि. २२: माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारित येणाऱ्या आणि दरवर्षी मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव – मिफ्फचे आयोजन करणाऱ्या एन.एफ.डी.सी. अर्थात ‘नॅशनल फिल्म डेवलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ यंदा १८ व्या मिफ्फमध्ये ॲनिमेशनविषयक विशेष कार्यशाळा घेणार असून त्यासाठी संस्थेने ॲनिमेशनच्या क्षेत्रात काम करण्यास सर्व इच्छुकांना आमंत्रित केले आहे. या कार्यशाळेच्या निमित्ताने ॲनिमेटर्सना त्यांची सृजनशीलता आजमावून पाहता येईल तसेच या क्षेत्रातील अनुभवी मंडळीकडून मोलाचे मार्गदर्शन मिळेल. ‘ॲनिमेशन क्रॅश कोर्स अँड व्हीएफएक्स पाईपलाईन वर्कशॉप’ अशी ही समावेशी कार्यशाळा असेल.

16 जून ते 20 जून दरम्यान आयोजित पाच दिवसांच्या कार्यशाळेचे नेतृत्व बॅटमॅन, वंडर वुमन या प्रसिद्ध ॲनिमेशनपटांचे काम करणारे वॉर्नर ब्रदर्स कंपनीतील अनुभवी, ज्येष्ठ ॲनिमेटर्स करणार आहेत. सहभागींना चित्रपट, मालिका आणि गेमिंग ॲनिमेशनविषयक प्रात्यक्षिकांचा अनुभव आणि कार्यक्षेत्राचे अंतरंग समजून घेता येतील.

भारतात ॲनिमेशन क्षेत्राची वाढ झपाट्याने होत आहे. ॲनिमेशनपट, व्हीएफएक्स अर्थात व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग ॲनिमेशन आणि मोबाईल माध्यमातही ॲनिमेशनला वाढती मागणी आहे. पर्यायाने कुशल आणि झोकून देऊन काम करण्यास इच्छुक ॲनिमेटर्ससाठी रोमांचक संधी उपलब्ध होत आहेत. भारतातील ॲनिमेशन क्षेत्र वेगाने वाढते आहे! फिक्की-ईवाय अहवाल २०२३ अनुसार, २०२३ पर्यंत २५% वृद्धिदरासह ४६ अब्ज रुपयांच्या वाढीचा अंदाज आणि युवावर्गासाठी भरपूर संधींचा अंदाज होता.

तुम्ही करिअरला सुरुवात करणारे ॲनिमेटर किंवा ॲनिमेशनच्या माध्यमातून कथाकथनाची आवड आणि सृजनशीलता जोपासण्यास इच्छुक म्हणून या क्षेत्राकडे पाहत असाल तर तुम्हा सर्वांसाठी ही कार्यशाळा खुली आहे. ॲनिमेशन क्षेत्रात समाधानकारक करिअरकडे जाण्यास इच्छुकांसाठी ही कार्यशाळा एक पायरी ठरेल. कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी ॲनिमेशनच्या पूर्वानुभवाची गरज नाही. फक्त भरपूर उत्साह आणि संगणक हाताळणीचे प्राथमिक कौशल्य आवश्यक आहे.

केवळ 20 जणांसाठीच जागा मर्यादित आहेत. त्यामुळे आजच प्रथम येणाऱ्याला प्राधान्य या तत्वानुसार नावनोंदणी करा. कार्यशाळेचे शुल्क केवळ १०,०००/- रुपये असून ब्लेंडर सारख्या सॉफ्टवेअरचा वापर त्यातच समाविष्ट आहे. ही कार्यशाळा एन एफ डी सी, २४ डॉ. गोपाळराव देशमुख मार्ग, मुंबई ४०००२६ येथे होणार आहे.

ही कार्यशाळा निवडण्यामागची कारणे :

  • उत्कृष्ट तज्ञांकडून शिकण्याची संधी : अतिशय कुशाग्र  आणि गेली कित्येक वर्ष व्यावसायिक स्वरूपाचं काम केलेल्या व्यवसायिकांकडून थेट शिकण्याची संधी.
  • प्रत्यक्ष शिकण्याचा अनुभव : तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तुमची स्वतःची ॲनिमेशन क्लिप तयार करून तुमची नवीन कौशल्ये प्रत्यक्षात वापरात आणण्याची सुवर्णसंधी मिळवा.
  • चित्रपट उद्योगाचे बारकावे : चित्रपट आणि गेमिंग ऍनिमेशन पाइपलाइनचे बारकावे समजून घेणे आणि नोकरीच्या संधी शोधणे
  • जागतिक मान्यताप्राप्त प्रमाणपत्र : अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर चित्रपट निर्मिती आणि ऍनिमेशन क्षेत्रातील भारतातील आघाडीची संस्था असलेल्या एन एफ डी सी चे अत्यंत प्रतिष्ठेचे प्रमाणपत्र मिळेल

अतिरिक्त लाभ:

  • पुरस्कार प्राप्त चित्रपटांचा अनुभव : समीक्षकांकडून नावाजलेले माहितीपट आणि ऍनिमेटेड शॉर्ट्स यांचा सर्वांगसुंदर अनुभव याचि देही याचि डोळा घेण्याचा विलक्षण अनुभव.
  • मास्टर क्लासेस: विशेष मास्टर क्लास सत्रांद्वारे चित्रपट क्षेत्रातील दिग्गजांकडून मार्गदर्शन

मर्यादित जागा उपलब्ध ! आताच नोंदणी करा

नोंदणी आणि अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या – https://miff.in/animation-crash-course/ किंवा आम्हाला pr@nfdcindia.com वर ईमेल करा

तुमचे अनिमेशन कौशल्य वृद्धिंगत करण्याची ही संधी दवडू नका आणि आणि प्रतिष्ठित मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सामील व्हा.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *