Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

काश्मीरमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेत, नाशिकचा वैमानिक निनाद हुतात्मा

Ninad Mandavgane

काश्मीरमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेत, नाशिकचा वैमानिक निनाद हुतात्मा

जम्मू काश्मीरच्या बडगाममध्ये कोसळलेल्या हेलिकॉप्टरमध्ये 2 वैमानिकांसह 6 जवान शहीद झाले. बुधवारी सकाळी 10 वाजता ही दुर्घटना घडली. भारतीय हवाई दलाचे एमआय -17 या परदेशी बनावटीचे मालवाहू हेलिकॉप्टर बडगाम परिसरातून जात असताना तांत्रिक बिघाडामुळे मध्येच कोसळले.

या घटनेत नाशिकचे पायलट स्कॉड्रन लीडर निनाद अनिल मांडवगणे हे देखील शहीद झाले. त्यांच्या मागे त्यांच्या पत्नी विजेता, दोन वर्षांची मुलगी, आई-वडील आणि धाकटा भाऊ असे कुटुंब आहे. नाशिकचा निनाद औरंगाबादच्या सैनिकी सेवा पूर्व संस्थेच्या २६ व्या कोर्सचा माजी विद्यार्थी होता. तिथून त्याची निवड पुणे येथे एनडीएमध्ये झाली. त्यानंतर तो हेलिकॉप्टर पायलट झाला.

नाशिकच्या डीजीपीनगर मध्ये निनाद यांचा जन्म १९८६ ला झाला होता. निनादचे पाचवी ते दहावीपर्यंत शिक्षण भोसला मिलिटरी मध्ये तर ११ वी आणि १२ वीचे चे शिक्षण औरंगाबादच्या सैनिकी संस्थेत झाले होते. नंतर त्याने बी. ई. मेकॅनिकल इंजिनीयरिंग पूर्ण करून हैद्राबाद ट्रेनिंग कमिशन मध्ये ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर २००९ ला एअर फोर्स मध्ये स्कॉड्रन लीडर पदावर सेवेत रुजू होऊन गुवाहाटी, गोरखपूर येथे सेवा करून एक महिन्यापूर्वीच श्रीनगर येथे बदली झाली होती. ज्यानंतर ही दुःखद घटना घडली आहे.

निनादचे वडील बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करत होते. आता ते सेवानिवृत्त झाले असून आईही सेवेतून सेवानिवृत्त झाली आहे. निनाद हा त्यांचा मोठा मुलगा असून लहान मुलगा जर्मनीत सी. ए. पदावर सेवेत आहे. आमच्या कुटुंबाचा आधारच गेला अशी प्रतिक्रिया त्याच्या आई वडिलांनी दिली आहे. निनादने आपल्या सेवेत असताना आपल्या देशाचे नाव उज्ज्वल केले आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *