Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशावर आमदार मंदाताई म्हात्रे यांनी व्यक्त केली नाराजी

गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशावर आमदार मंदाताई म्हात्रे यांनी व्यक्त केली नाराजी


बेलापूर: भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी राज्यातल्या काही मोठ्या नेत्यांचा मुहूर्त ठरला असून काही नेते उद्या ३१ जुलै रोजी भाजपात प्रवेश करणार आहेत नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे मातब्बर नेते व माजी मंत्री गणेश नाईक पुत्र आमदार संदीप नाईक आणि आपल्या समर्थक नगरसेवकांसह पक्ष प्रवेशासाठी सज्ज झाले आहेत. पण त्याच वेळी आता एका पक्षांतर्गत नाराजीनाट्याचा अंक सुरू झाला आहे.

बेलापूर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी नाईक यांच्या भाजप प्रवेशाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गणेश नाईक यांच्यावर टीका करताना त्या म्हणाल्या की नाईक हे स्वतःचं साम्राज्य वाचवण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. त्यांना भाजप बद्दल जराही आपुलकी नाही. या संदर्भात आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असून ते हुशार असून योग्य तो निर्णय घेतील असेही त्या पुढे म्हणाल्या.

२०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये प्रवेश करत बेलापूर विधानसभा मतदारसंघाचे तिकिटही मिळवले होते. या निवडणुकीत त्यांनी गणेश नाईक यांच्या पराभव करत मोठया फरकाने विजय मिळवला होता. पण आता त्याच विरोधकाच्या भाजप प्रवेशामुळे त्या खूप नाराज झालेल्या आहेत.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *