Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

सातारा-जावळी चे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला आमदारकीचा राजीनामा

सातारा-जावळी चे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला आमदारकीचा राजीनामा

सातारा/मुंबई: सातारा जावळी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अखेर आज आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे आज विधिमंडळात विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे त्यांनी राजीनामा सुपूर्त केला.

सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार उदयनराजे भोसले यांच्याशी असलेले त्यांचे राजकीय सर्वश्रुत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही वेळोवेळी दोघांचं मनोमिलन घडवून आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला. कालही पुण्यात शरद पवार यांनी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचं मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला, पण पक्ष सोडण्याच्या आपल्या निर्धारावर ठाम असलेल्या शिवेंद्रसिंह यांनी त्यास नकार दिला. उद्या दिनांक ३१ जुलै रोजी शिवेंद्रसिंहराजे भोसले आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत.

गेल्याच आठवड्यात सचिन आहिर आणि चित्रा वाघ या राष्ट्रवादीच्या शिलेदारांनी अनुक्रमे शिवसेना व भाजपची वाट धरली. आणि आज शिवेंद्रसिंहराजे यांनी राजीनामा दिल्यामुळे राष्ट्रवादीला अजून एक धक्का मिळाला आहे. त्यात अजून एक भर म्हणजे उद्या नवी मुंबई महानगरपालिकेचे ५२ नगरसेवक आमदार संदीप नाईक यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचेही निश्चित झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मातब्बर नेते एकेक करून पक्ष सोडून चालल्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व त्यांचे कार्यकर्तेही हवालदिल झाले आहेत.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *