Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

उद्धव ठाकरेंना लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार प्रदान

लोकमतच्या मंचावर उद्धव ठाकरेंनी विचारलं ‘हाऊज् द जोश’, मुख्यमंत्री म्हणतात ‘हाय सर!’

येत्या २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी शिवसेना-भाजप यांची युती झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दोघंही पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रमात एकाच मंचावर आले.

२० फेब्रुवारी रोजी मुंबईत पार पडलेल्या ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्कार वितरण सोहळ्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील, गिरीष बापट आदी राजकीय नेते उपस्थित होते.

पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या हस्ते उद्धव ठाकरेंना सन्मानित करण्यात आलं.

उद्धव ठाकरे यांना राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी ‘पॉवर आयकॉन’ पुरस्काराने गौरवण्यात आलं. पुरस्कार मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी लोकमतचे आभार मानले. पुढे उद्धवजी म्हणाले, आज राजकारणावर बोलायचं नाही. कारण युतीची घोषणा झाल्यापासून काय बोलावं हेच सूचत नाही.

त्यानंतर उद्धव यांनी मी सर्व प्रथम आपल्या मुख्यमंत्र्यांना हाऊज द जोश असं विचारु इच्छितो असं म्हटलं, यावर मुख्यमंत्र्यांनी उद्धव यांच्याकडे पाहत स्मित हास्य केलं. आणि ‘हाय सर’ असं उत्तर दिलं. कौशलच्या ‘उरी’ चित्रपटातील हा डायलॉग प्रचंड प्रसिद्ध झाला आहे.

त्यानंतर उद्धव यांनी, भाजप शिवसेना युतीबद्दल ज्यांना जे बोलायचं असेल ते बोला, जेव्हा मैदानात याल तेव्हा बघू काय करायचं ते’ असं म्हणत त्यांनी विरोधकांना इशारा दिला. उद्धव यांनी पुलवामा हल्ल्याबद्दल बोलताना पाकिस्तानवर जोरदार टीका केली.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *