Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

विदर्भ आणि मराठवाड्याला गारपिटीचा फटका

Rainy Storm

विदर्भ आणि मराठवाड्याला गारपिटीचा फटका

विदर्भ आणि मराठवाड्यात 20 आणि 21 फेब्रुवारीला वादळी पाऊस पडण्याचा अंदाज काही दिवसांपूर्वीच हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. काल रात्री विदर्भ आणि मराठवाड्याला वादळी पाऊस आणि गारपिटीचा चांगलाच फटका बसला आहे.

बुलढाणा आणि जालना जिल्ह्यातील घनसांगवी आणि भोकरदन तालुक्यात रात्री वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला. भोकरदन तालुक्यातल्या पारध, रेणुकाई पिंपळगाव गावात रात्रीच्या वेळीस सुमारे २० मिनिटे गारांचा जोरदार वर्षाव होत होता .

गारपिटीने गहू, मोसंबीसोबत हरभऱ्याच्या पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. जालना जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे फळबागांवर रोगराईचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता कृषी तज्ञांनी व्यक्त केली आहे. अवकाळी पावसामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांमध्ये मात्र चिंतेचं वातावरण निर्माण आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *