Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

आजची खमंग रेसिपी : गरमा गरम पोहे पॅटिस

Cook Chef

आजची खमंग रेसिपी : गरमा गरम पोहे पॅटिस

साहित्य : जाडपोहे, उकडलेले बटाटे, आले-मिरची पेस्ट, गरम मसाला, लाल तिखट, रवा, भाज्या आणि चवीनुसार मीठ.

कृती :- प्रथम पोहे एका भांडयात धुऊन भिजवून कुस्करून घ्यावेत. नंतर त्यात उकडलेला बटाटासुद्धा कुस्करून घालावा. ताज्या भाज्या (वाटाण, फरसबी, फ्लोवर) थोडय़ाशा वाफवून आणि बारीक चिरून घ्याव्यात.

त्या भाज्या एका मोठ्या भांड्यात काढून घ्या त्या चवीनुसार मीठ, आले-मिरची पेस्ट, गरम मसाला, लाल तिखट, घालून ते वाटण एक जीव करून घ्यावेत. हे सर्व वाटण पोह्यात मिक्स करून घ्या त्यात तुम्ही तुम्हाला आवडेल तो कोणताही मसाला वापरू शकता. किंवा त्यात पाव भाजी मसालाही टाकू शकता.

हे सर्व मिश्न एक जीव झाल्यावर हातावर थोडे तेल लावून त्या मिश्रणाचे बारीक गोळे तयार करून घ्या ते गोळे रव्यामध्ये घोळवावेत आणि नंतर तव्यावर मस्त लालसर खरपूस होई पर्यंत भाजून घ्यावेत. पाच ते दहा मिनिटामध्ये तुमचे पोहे पॅटिस खाण्यासाठी तयार होतील. ते पॅटिस एका डिश मध्ये कडून टमोटो सॉस सोबत खाण्यासाठी सर्व्ह करा. हे पोहे पॅटिस तुम्ही तुमच्या मुलांना शाळेत टिफिन मध्ये ही देऊ शकता.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *