Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

कोमसाप उरण तर्फे ‘साहित्यिक ज्ञानसागर पुरस्कार’ वितरण सोहळा संपन्न

कोमसाप उरण तर्फे ‘साहित्यिक ज्ञानसागर पुरस्कार’ वितरण सोहळा संपन्न

उरण, दि. २४(विठ्ठल ममताबादे): उरण तालुक्यातील वशेणी इतिहास संपादकीय मंडळ आणि कोकण मराठी साहित्य परिषद उरण तर्फे साहित्यिक ज्ञानसागर पुरस्कार वितरण सोहळा उरण तालुक्यातील वशेणी येथे संपन्न झाला. सदर कार्यक्रमास रायगड भूषण प्रा. एल. बी. पाटील, कोमसाप चे रायगड जिल्हाध्यक्ष सुधीर शेठ, समन्वयक अ. वि. जंगम, कोमसाप दक्षिण रायगड अध्यक्ष संजय गुंजाळ, अ‍ॅड. गोपाळ शेळके, सेवानिवृत्त मुख्याध्यापक सदाशिव पाटील, उरण मधुबन कट्टा अध्यक्ष भगवान म्हात्रे आदि मान्यवर उपस्थित होते.

१ ऑगस्ट २०२० पासून ऑनलाईन मधुबन व्हाट्सअप समुहावर साहित्यिक ज्ञानसागर प्रश्न मंजूषा हा उपक्रम सुरू करण्यात आला होता. वर्षभरात एकूण ५० भाग झाले. या ५० भागात ३०० पैकी सर्वाधिक गुण मिळवणा-या पाच विजेत्यांना व पाच उपविजेत्यांना साहित्यिक ज्ञानसागर पुरस्कार प्रदान करण्यात आले. विविध मान्यवरांच्या हस्ते शाल, सन्मानचिन्ह, पुष्पवाटिका, प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देऊन विजेत्यांचा गौरव करण्यात आला.

साहित्यिक ज्ञानसागर पुरस्कार विजेते पुढील प्रमाणे

१) प्रविण शांताराम – पनवेल
२) अ‍ॅड. संदिप बागडे – कर्जत
३) संजना जुवाटकर – ठाणे
४) संजीव पाटील – उरण
५) रंजना केणी – उरण

उपविजेते खालील प्रमाणे

१) संपदा संजीव पाटील – उरण
२) संजय होळकर – पोलादपूर
३) मनोहर म्हात्रे – विक्रोळी
४) अ‍ॅड. माधुरी थळकर – पनवेल
५)  संतोष पाटील – पनवेल

विशेष पुरस्कार

१) उत्कृष्ट गीत लेखन पुरस्कार – महेश बार्शी – कर्जत
२) कोकण जनसेवक पुरस्कार – रविंद्र बेडकिहाळ – सातारा
३) उत्कृष्ट कार्यवाहक – मच्छिंद्रनाथ म्हात्रे – उरण

या पुरस्कार सोहळ्यासोबत मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त निमंत्रित कवींचे कविसंमेलन देखील आयोजित केले होते. या कविसंमेलनात २५ कवींनी प्रतिभासंपन्न अशा कविता सादर करून उपस्थितांना काव्याचा आनंद दिला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रंजना केणी यांनी पाहिले. बासरी वादनातून कोपरखैरणे येथील प्र. ना. बागडे यांनी ईशस्तवन सादर केले. तर जयश्री गावडे यांनी सुमधूर आवाजात स्वागत पद्य सादर केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सतिश पाटील, पुरूषोत्तम पाटील, संदेश गावंड, कैलास पाटील, अनंत तांडेल, मनोज गावंड, रमेश पाटील, आदिनाथ पाटील, बी. जे. म्हात्रे आदींनी विशेष सहकार्य केले.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *