Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला ८८५०३०३४६३ वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा

काश्मीरमध्ये यंदाच्या मोसमात पर्यटकांची विक्रमी हजेरी

काश्मीरमध्ये यंदाच्या मोसमात पर्यटकांची विक्रमी हजेरी

श्रीनगर: काश्मीर खोरं पर्यटकांनी फुलून गेलं आहे. श्रीनगर विमानतळावर काल एकूण ५८ विमानांमधून  ९ हजार ८२३ प्रवाशांचं आगमन झालं. ही आतापर्यंतची सर्वात जास्त संख्या असून तिनं विमानतळाची प्रवासी हाताळण्याची क्षमता पार केली. गेले काही दिवस काश्मीरमध्ये विक्रमी संख्येनं पर्यटक येत असून श्रीनगर, गुलमर्ग, पहलगाम आणि अन्य ठिकाणची हॉटेल्स, गेस्ट हाउसेस आणि हाउस बोट यंदाच्या उन्हाळी मोसमात पूर्ण क्षमतेनं भरली आहेत.

यंदाच्या मार्च महिन्यात दीड लाखापेक्षा जास्त पर्यटकांनी काश्मीरला भेट दिली. सध्या सुरु असलेल्या नवरात्री उत्सवाच्या निमित्तानं जम्मू इथल्या माता वैष्णव देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या संख्येनं देखील विक्रम नोंदवला. जम्मू-काश्मीर पर्यटन विभाग सध्या तेजीत असून येत्या काही महिन्यांमध्ये काश्मीरला  मोठ्या संख्येनं पर्यटक भेट देतील असा अंदाज काश्मीरचे मुख्य सचिव अरुण कुमार मेहता यांनी व्यक्त केला.

Source-AIR

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *