Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

द्रोणागिरी पर्वतावरील अवैध माती उत्खनन बंद करण्याची करंजा ग्रामस्थांची मागणी

द्रोणागिरी पर्वतावरील माती उत्खननची सखोल चौकशी करण्याचे आमदार महेंद्र दळवी यांचे करंजा ग्रामस्थांना आश्वासन

उरण, दि. ११(विठ्ठल ममताबादे): उरण तालुक्याला ऐतिहासिक व धार्मिक सांस्कृतिक महत्व आहे. रामायणात हनुमनाने संजीवनी नेली त्यातील काही भाग द्रोणागिरी पर्वतावर पडला असल्याची पुरातन काळात नोंद आहे. अशा उरण तालुक्यातील सुप्रसिद्ध असलेल्या द्रोणागिरी पर्वतावर गेली अनेक वर्षांपासून मातीचे उखनन सुरू आहे. त्यामुळे भविष्यात या ठिकाणी माळीण सारखी दुर्घटना घडण्याची शक्यता लक्षात वर्तवली जात आहे. द्रोणागिरी पर्वत वाचविण्यासाठी करंजा ग्रामस्थांनी आमदार महेंद्र दळवी यांची भेट घेत साकडे घातले. यावेळी आमदार दळवी यांनी माती उतखन्नाची सखोल चौकशी करून उखनन थांबविण्याचे आश्वासन चाणजे ग्रामस्थांना दिले.

रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील द्रोणागिरी येथील शिवकालीन किल्ला प्रसिद्ध आहे. तरीही द्रोणागिरी पर्वत गेली अनेक वर्षांपासून पोखरून माती उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यामुळे पर्वत पूर्णपणे खिळखिळा होऊन लागला आहे. पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून यामुळे सजीव सृष्टीही धोक्यात आली आहे. सततच्या होणाऱ्या माती उत्खननामुळे भविष्यात माळीण सारख्या दुर्घटनेचा सामना उरणकरांना विशेषतः चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील जनतेला करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वेळीच सावध होण्याची गरज आहे.

द्रोणागिरी पर्वताच्या कुशीत ओएनजीसी सारखी राष्ट्रीय स्तरावरील केमिकल्स व ज्वलनशील कंपनी कार्यरत आहे. माती उत्खननाची झळ ओएनजीसी कंपनीला बसली तर उरणचा भोपाळ होण्यास वेळ लागणार नाही. त्याचप्रमाणे जरी खाजगी जमिनीतून जरी मातीचे उत्खनन होत असले तरी या ठिकाणचे अरुंद रस्ते व त्यावरून जलप्रवास करणार्‍या प्रवासीवर्गाची, शाळकरी मुलांची, कामगार वर्ग व २५ हजार लोकसंख्या असलेल्या करंजा ग्रामस्थांची रस्त्यावरील वर्दळ विचारात घेता याठिकाणी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत. या सर्वांपासून व द्रोणागिरी पर्वत वाचवून किल्ल्याचे अस्तित्व अबाधित राखण्यासाठी करंजा ग्रामस्थांनी एकत्र येत याविरोधात आवाज उठविला आहे.

करंजा ग्रामस्थांनी माजी जि.प. अध्यक्ष दिवंगत रमेश डाऊर यांचे सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते सचिन डाऊर यांच्या नेतृत्वाखाली आमदार महेंद्र दळवी यांची त्यांच्या अलिबाग येथील निवासस्थानी भेट घेत द्रोणागिरी पर्वतावरील माती उखनन त्वरित बंद करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी आमदार दळवी यांनी त्वरित जिल्हाधिकारी यांना फोन लावून याची दखल घेण्यास सांगितले. तशा प्रकारचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी अमोल जाधव यांनी निवेदन स्वीकारले.

आमदार दळवी यांनी द्रोणागिरी पर्वतावरील सर्व माती उखनाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन सचिन डाऊर यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या करंजा ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाला दिले आहे. यामुळे द्रोणागिरी पर्वतावरील मातीचे उखनन थांबेल असा विश्वास करंजा ग्रामस्थांनी व्यक्त केला.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *