Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडां विरोधातल्या पोस्टमूळे शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्याला अमानुष मारहाण; भाजपने मागितला राजीनामा

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडां विरोधातल्या पोस्टमूळे शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्याला अमानुष मारहाण; भाजपने मागितला राजीनामा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात दि. ५ रोजी सोशल मीडियावर अनंत कारमुसे यांनी एक पोस्ट केली होती. जी आक्षेपार्ह असल्याचे कळते. सदर पोस्ट प्रसारित केल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्या पोलीस अंगरक्षकाने व इतर काही जणांनी आपल्याला बेदम मारहण केल्याची तक्रार कारमुसे यांनी वर्तकनगर पोलीस स्थानकात दाखल केली होती. या प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता दिवे, मेणबत्ती लावण्याचे आवाहन समस्त देशाला केले होते. यावर जितेंद्र आव्हाड यांनी आपला विरोध दर्शविला होता. यावेळी यासंदर्भात त्यांच्यावर अनेकांनी टीका केली. ज्यात अनंत कारमुसेही होते. ५ तारखेला रात्री ११:३० वाजता दोन गणवेषधारी व दोन साध्य वेशातील पोलिस त्यांना आव्हाड यांच्या बंगल्यावर घेऊन गेल्याचे व तेथे त्यांना अंगरक्षक पोलिसांसह इतर काही जणांनी बेदम मारहाण केल्याचा आपल्या तक्रारीत त्यांनी नमूद केले आहे. याचे फोटोही सोशल मीडियावर काल पासून दिवसभर निषेधाच्या विविध पोस्टने व्हायरल होत आहेत.

याप्रकरणी राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस निषेध नोंदवत म्हणाले की, “एखाद्या व्यक्तीला मंत्र्यांच्या सुरक्षारक्षकाने, मंत्र्यांच्या घरी नेऊन, मंत्र्यांच्या उपस्थितीत बेदम मारहाण करणे, ही अतिशय गंभीर घटना आहे.
मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे यांनी मंत्री जितेंद्र आव्हाड याना मंत्रिमंडळातून तत्काळ बडतर्फ करावे.”

पुढे ते म्हणाले की, “सामान्य माणसांवर अन्याय झाला तर त्याविरुद्ध आवाज उठवणे गैर नाही.
न घाबरता प्रत्येकाला आपले मत मांडता आले पाहिजे.
सोशल मीडियाचा कुणी चुकीचा वापर केला तर तक्रार करण्याचा आपला अधिकार अबाधित आहे.
पण शासनकर्तेच मारहाण करीत असतील, तर कायद्याचे राज्यच अस्तित्वात राहणार नाही.”

भाजपचे ठाण्यातील नेते निरंजन डावखरे यांनीही ट्विटरद्वारे आपला निषेध व्यक्त केला. तसेच भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनीही निषेध व्यक्त करत म्हटले की, “ठाण्यातील या विलक्षण संताप जनक प्रकाराबद्दल ठाणे पोलिस आयुक्तांशी दिल्लीहून फोन वर बोललो. पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिले आहेच, पण गंभीर मुद्दा कायद्याच्या रक्षकांनी कायदा हातात घेण्याचा आहे! हा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी परिश्रमाने साकारलेल्या संविधानाचा अपमान आहे!निषेध!”

दरम्यान अनंत करमुसे हे संभाजी भिडे संचालित शिवप्रतिष्ठान संघटनेचे ठाण्यातील सक्रिय कार्यक्रते असल्याचे कळते. या प्रकरणी शिवप्रतिष्ठान संघटनेनेही आपला निषेध व्यक्त केला आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *