Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

आयसीएआर-सीआयएफई ने दीक्षांत समारंभात ९० जणांना पदव्युत्तर आणि ३२ जणांना पीएच.डी. पदवी केली प्रदान

आयसीएआर-सीआयएफई ने दीक्षांत समारंभात ९० जणांना पदव्युत्तर आणि ३२ जणांना पीएच.डी. पदवी केली प्रदान

मुंबई, दि. ५: आयसीएआर – सीआयएफई – सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशनच्या आज मुंबईतील संकुलात पार पडलेल्या दीक्षांत समारंभात आयसीएआर – सीआयएफई चे संचालक आणि कुलगुरू डॉ. रविशंकर सी.एन. यांच्या हस्ते ९० विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी ९मास्टर्स) तर ३२ विद्यार्थीना पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. देशातील मत्स्यव्यवसाय उच्च शिक्षणाचे आयसीएआर – सीआयएफई हे उत्कृष्ट केंद्र आहे. मत्स्यपालनाच्या ११ उच्च विशिष्ट विषयांमध्ये पदव्युत्तर आणि डॉक्टरेट विद्यार्थी तयार करणारे जगातील एकमेव विद्यापीठ म्हणूनही ते ओळखले जाते. तसेच देशातील मत्स्यव्यवसाय क्षेत्राला चालना देण्यासाठी विविध प्रकारचे तंत्रज्ञान त्यांनी विकसित केले आहे.

वैज्ञानिक औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) महासंचालक,आणि वैज्ञानिक आणि, विज्ञान आणि औद्योगिक संशोधन विभागाच्या सचिव डॉ. एन. कलैसेल्वी,या समारंभाच्या प्रमुख पाहुण्या होत्या. या दीक्षांत समारंभात, डॉ. एन कलैसेल्वी यांनी संपूर्ण भारतातील 28 दशलक्ष लोकांना रोजगार देणाऱ्या भरभराटीच्या आणि वेगाने वाढणाऱ्या क्षेत्राला पाठिंबा देण्यासाठी व्यावसायिक मत्स्यपालन शिक्षण देणाऱ्या या संस्थेची प्रशंसा केली.पदवीधर विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळत असल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी आपल्या कामातून देशाच्या विकासात योगदान देण्याचे आवाहन केले.  आयसीएआर-सीआयएफई दीक्षांत समारंभात पदवी प्रदान करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये अनेक विद्यार्थिनी आहेत याबद्दल डॉ. एन. कलैसेल्वी यांनी आनंद  व्यक्त केला.तसेच  त्यांनी पदवीधर विद्यार्थ्यांना उद्योजकीय उपक्रम सुरू करण्याचे आवाहनही केले. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आणि पदके पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांचे त्यांनी अभिनंदन केले आणि CIFE ला उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात आपला दर्जा टिकवून ठेवण्याचे आणि अधिक उंचावण्याचे  आवाहन केले.

2022 मध्ये एकूण 16.24-दशलक्ष टन माशांच्या उत्पादनात मत्स्यशेतीचे योगदान,वाढत असून या क्षेत्रातील वाढत्या उद्योजकीय उपक्रमांशी ते जोडलेले आहे.  प्रभावी तंत्रज्ञान विकसित आणि लागू केले जात आहे त्यातून भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मासळी उत्पादक देश आहे, असे सूचित होते. भारताच्या जीडीपी मध्ये या क्षेत्राचा वाटा जवळपास 1.2% आहे आणि निर्यात महसूल  64,000 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. 2023 मध्ये भारताला जगातील दर्जेदार मासळीचा अग्रगण्य उत्पादक आणि ग्राहक बनवण्याच्या या परिवर्तनीय प्रवासात मत्स्यपालन शिक्षण आणि व्यावसायिकांची भूमिका महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

ICAR-CIFE ने अंतर्देशीय क्षारयुक्त मत्स्यशेतीसाठी ऊर्जा-कार्यक्षम आणि पर्यावरणास अनुकूल तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी केलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाची डॉ.कलईसेल्वी यांनी यावेळी प्रशंसा केली. 2050 पर्यंत जगाला अधिक अन्नाची गरज आहे यावरही डॉ. कलैसेल्वी यांनी भर दिला त्यामुळे येत्या काळात मत्स्यपालन संशोधन आणि शिक्षण महत्त्वाचे ठरेल, अशी अपेक्षा  त्यांनी यावेळी व्यक्त केली.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *