‘हा’ पाकिस्तानी अभिनेता म्हणाला “हो, मी आय.एस.आय. चा गुप्तचर आहे
पाकिस्तान: सध्या भारत आणि पाकिस्तान या देशांमध्ये काश्मीर मधील कलम ३७० वरून वातावरण तंग आहे. अगदी सीमेवरही दोन्ही सैन्याने बंदुका ताणून धरल्या आहेत. तशाच प्रकारचं युद्ध माध्यमांमधील चर्चांमध्ये रंगायला लागलं आहे.
त्याच झालं असं की एका भारतीय वृत्त वाहिनीवर एका चर्चेमध्ये झालेल्या वृतांकनावर संतापलेल्या पाकिस्तानमधील एका अभिनेत्याने स्वतःला पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणा आय.एस.आय. चा एजंट असल्याचे म्हटले आहे.
या बाबत पाकिस्तानी अभिनेता हमजा अली अब्बासी ने ट्विटरवर एक फोटो शेअर करत आपला संताप व्यक्त केला व त्यापाठोपाठ वादग्रस्त वाक्तव्यही केलं. तो आपल्या ट्विट मध्ये म्हणाला की एक युद्धखोरील प्रोत्साहन देणाऱ्या ओव्हरऍक्टर गृहस्थ अर्णब याने आणि त्याच्या वाहिनीने मला आय.एस.आय. चा गुप्तचर असल्याचे म्हटले आहे. मला एक गोष्ट स्पष्ट करुदेत की मी कोणी गुप्तचर एजेंट नाही तर मी उघडपणे सांगतो की मी आय.एस.आय. चा एजेंट आहे जसे २० कोटी पाकिस्तानी आहेत.”
https://twitter.com/iamhamzaabbasi/status/1161810099712778245?s=19
हमजाने पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत यापूर्वी वादग्रस्त विधाने केली असून यामुळे तो मोठ्या प्रमाणात ट्रोलही झाला होता. आताही त्याने केलेल्या वक्तव्याने ट्विटर वॉर तेजीत आलं आहे.
