Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

“ईडीच्या नोटिशीला मनसे भीक घालत नाही”; मनसे नेते संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया

“ईडीच्या नोटिशीला मनसे भीक घालत नाही”; मनसे नेते संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया

दादर येथील कोहिनूर मिल खरेदी प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडी (अंमलबजावणी संचालनालय) ने नोटीस बजावली. त्यानंतर मनसे आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना म्हणाले की, “आम्ही चौकशीला सामोरे जाऊ, कर नाही त्याला डर कशाला? आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तर मनसे रस्त्यावर उतरतील. मनसे अशा नोटिशीला भीक घालत नाही.”

या संदर्भात ट्विट करत ते म्हणाले की जर सरकार सत्याचं असेल, तर पहिलं मुंबई बँकेत काहिशे कोटींचा घोटाळा करणाऱ्या भाजपाच्या आमदारांची चौकशी करा. नोटीस काढायची गरजपण लागणारं नाही, अर्ध्यापेक्षा भाजपाचे घोटाळेबाज आमदार जेलमध्ये असतील. असे म्हणत त्यांनी मनसेच्या माजी आमदारावर अप्रत्यक्ष आरोप केले.

तसेच पुढे पंतप्रधान मोदींवर टीका करताना म्हणाले की, “पंतप्रधान मोदी म्हणजे नव्या भारताचे नवे हिटलर”

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *