Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला ९३७२२३६३३२ वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा

मुंबई शहर जिल्ह्यातील शासकीय वसतिगृहासाठी ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू

मुंबई शहर जिल्ह्यातील शासकीय वसतिगृहासाठी ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू

मुंबई, दि.२५ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कार्यरत असलेले मुंबई शहर जिल्ह्यातील मुलामुलींच्या शासकीय वसतिगृहांचे सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाकरिता ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया दि. २२ नोव्हेंबर २०२१ रोजी पासून सुरु झाली आहे.

राज्यातील मुंबई वगळुन इतर जिल्ह्यातील विद्यार्थी व विद्यार्थीनींनी खालील पत्त्यावर कार्यालयीन वेळेत ऑफलाईन प्रवेश आवेदन पत्र प्राप्त करुन त्यासोबत जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये महाविद्यालयात प्रवेश घेतल्याची पावती, २ पासपोर्ट फोटो इत्यादी जोडून आवेदनपत्र सादर करण्यात यावे.

वसतिगृहाचे नाव, पत्ता व गृहपाल संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे आहे.मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, बी.डी.डी. चाळ, वरळी-118, मुंबई-400018, संपर्क क्र. 8830316553; डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह, वरळी-116, बी.डी.डी. चाळ, वरळी-116, मुंबई-400018, संपर्क क्र. 8830316553; संत मिराबाई मुलींचे शासकीय वसतिगृह, वरळी-116, बी.डी.डी. चाळ, वरळी-116, मुंबई-400018, संपर्क क्र. 9987790430 असे पत्रकाद्वारे मुंबई शहरचे सहाय्यक आयुक्त यांनी कळविले आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *