Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

जाणून घ्या फेसबूक-व्हॉटसअप नेमकी तुमची कोणती माहिती गोळा करतं?

सध्या व्हॉटसअॅप आणि फेसबुक यावरुन data privacy चा विषय खूपच चर्चेत आला आहे

व्हॉटसअॅप आपली कोणती माहिती गोळा करुन इतरांना पुरवणार आहे? तर आपण कुठे आहोत ते ठिकाण, कम्प्युटरवरचा आयपी अॅड्रेस, वापरत असलेली आॉपरेटिंग सिस्टीम, आपल्या मोबाईलची बॅटरी लेव्हल, आपण वापरत असलेलं नेटवर्क (रिलायन्स / बीएसएसनएल इ.), भाषा, जगात ज्या स्थानिक प्रमाणवेळेत आहोत तो झोन, आपल्या मोबाईलचा IMEI क्रमांक (या १५ आकडी नंबरवरुन आपला मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला तर थांग लावता येतो)… तसंच आपण मेसेज कोणते/कशा प्रकारचे पाठवतो, कोणाला फोन करतो, कोणत्या ग्रुपचे सभासद आहोत, आपलं स्टेटस, आपला प्रोफाईल फोटो तसेच आपण आॉनलाईन कधी होतो.

या माहिती पुरवण्यात आपण केलेली आॉनलाईन transactions and payments हा अजून एक प्रकार व्हॉटसअॅपनं वाढवला आहे. कोणत्या अॅपवरुन आपण पेमेंटस केली इ. माहिती त्यात येते.

युरोपियन युनियन्समधले युजर्स सोडून इतर ठिकाणी व्हॉटसअॅपच्या privacy policy मध्ये हे बदल घडण्याची शक्यता आहे.

खरं तर आपली वैयक्तिक माहिती कम्प्युटरवर फारशी “सुरक्षित” नाही हे “उघड गुपित” आहे.

फेसबुक आधीच तुमच्याबद्दल कोणकोणती माहिती गोळा करतं? तर तुमचं पृथ्वीवरचं ठिकाण, वय, पिढी, लिंग, भाषा, शिक्षण, शिक्षणाचं क्षेत्र, शाळा, वंश, उत्पन्न, खर्च, कोणत्या प्रकारचं घर आहे त्याची माहिती, घराची किंमत, घराचा आकार, घराचं चौरस फुटातलं क्षेत्रफळ, तुमच्या मित्रयादीत पुढच्या ३० दिवसात कितीजणांची अॅनिव्हर्सरी किंवा वाढदिवस आहे, कितीजण कुटुंबापासून दुसर््या शहरात रहातात, कोणत्या मित्रांचं नवीन लग्न किंवा साखरपुडा झाला आहे, किती जण लीव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहेत, किती जणांना नुकतीच नोकरी मिळाली आहे. किती जणांनी नुकतंच घर बदललं आहे, पालकांचं वय किती आहे, तुम्हाला मूल होणार असेल तर कधी होणार आहे, राजकारणात किती जणांना रस आहे, कितीजण अंतर्मुख किंवा बहिर्मुख स्वभावाचे आहेत, तुम्ही नोकरी कुठे करता, ते उद्योगाचा क्षेत्र कोणतं आहे, तुमचा हुद्दा, तुमचं आॉफिस कसं आहे, तुमच्या आवडीनिवडी, मोटारसायकल्स वापरायला किती जणांना आवडतं, कोण मोटारगाडी घ्यायचा विचार करतंय (किंमत /ब्रॅंड इ.), कोण गाडी दुरुस्तीला देणार आहे, किती वर्षात गाडी बदलता, तुमच्या कंपनीतले किती जण मोटारगाड्या वापरतात, तुम्ही कोणती ऑपरेटिंग सिस्टीम वापरता, गेम्स किती जण खेळतात, कितीजण फेसबुकवर इव्हेंटस तयार करतात, फेसबुकवरुन जाहिराती करायला किती जण किती पैसे देतात, कोणता यूजर कोणतं फेसबुक पेज अॅडमिनिस्टर करतो, कोण किती, कोणते फोटो अपलोड करतं, तुम्ही कोणता इंटरनेट ब्राऊजर, इमेल्स, इतर अॅप्स वापरता, नवीन तंत्रज्ञान बाजारात आल्यावर किती दिवसांनी वापरता, तुम्ही कोणत्या देशात जन्माला आलात आणि आत्ता कुठे रहाता, तुम्ही कोणत्या संघटनेत आहात, तुमच्याकडे किती क्रेडिट / डेबिट कार्डस आहेत, ती तुम्ही किती वेळा वापरता, तुम्ही रेडिओ ऐकता का, कोणते टीव्ही कार्यक्रम बघता, कोणता मोबाईल वापरता, इंटरनेट कनेक्शन कोणतं वापरता, नुकताच स्मार्टफोन घेतला आहे का? इंटरनेट स्मार्टफोनवरुन वापरता का, कोणत्या प्रकारचे कपडे घालता, सर्वात जास्त खरेदी वर्षातून कधी करता, बिअर/वाईन किंवा इतर मद्य खूप जास्त प्रमाणात कोण विकत घेतं, जास्त किराणासामान कोण घेतं, जास्त सौंदर्यप्रसाधनं कोण घेतं, कोणती औषधं कोण घेतं.

२००७ साली मार्क झुकेरबर्ग सीईओ शोधत होता त्यावेळी त्यानं इंजिनिअर किंवा तंत्रज्ञ शोधला नाही तर जाहिरातक्षेत्रात करिअर केलेल्या शेरिल सॅंडबर्गला नियुक्त केलं हे पुरेसं बोलकं आहे. “१९८४” या कादंबरीत जॉर्ज आॉरवेलनं “माणसाचा प्रत्येक संवाद आणि प्रत्येक विचार यावर लक्ष ठेवलं जाईल” असा इशारा दिला होता. याच कादंबरीतला बिग बॉस पुढे म्हणतो, “इतरांचं भलं कसं होईल याच्याशी आम्हाला काही देणंघेणं नाही. आम्हाला फक्त सत्ता मिळवण्यात आणि गाजवण्यात रस आहे…!”

१९७७ साली सिडने शेल्डनच्या ब्लडलाईन या कादंबरीत एक प्रसंग होता. तो असा :
मॅक्सनं कम्प्युटरला आदेश दिला, “मला जरा अलेक निकोलसबद्दल सांग…” समोरच्या कम्प्युटरनं माहिती पुरवायला सुरुवात केली. गेल्या काही वर्षांमध्ये अलेकनं बॅंकेत किती पैसे भरले, त्याचे किती चेक कॅन्सल झाले, कोणत्या बिलांसाठी पैसे दिले, त्याच्याकडे एक बेंटली आणि एक मॉरिस मोटारगाडी आहे (पण सात वर्षात एकही दुरुस्तीचं बिल नाही..), एक चेक व्हाईट क्लबला दिलाय, दुसरा चेक साऊथ आफ्रिकेतल्या एका स्त्रियांच्या कपड्यांच्या दुकानाला इव्हिनिंग गाऊनसाठी दिलाय, एक डेंटिस्टला दिलाय, इव्हिनिंग गाऊनसाठी परत एका दुकानाला चेक दिलाय, (यावेळी मात्र ते पॅरिसमधलं दुकान होतं.), हेअरड्रेसर, घरातल्या नोकरांना दिलेले चेक.. असं सगळं काही क्षणांमध्ये मॅक्सला कम्प्युटरनं सांगितलं. मग मॅक्सनं कम्प्युटरला र््हि्स विल्यम्सबद्दल माहिती विचारली. क्षणार्धात र््हिोसचं जन्मसाल, जन्माचं ठिकाणं, पगार, नोकरी करत असलेल्या कंपनीचं नाव, लंडनमधल्या सेव्हिंग अकाऊंटचा बॅलन्स, झुरिकमधल्या एका सेफ्टी डिपॉझिट बॉक्सचा क्रमांक, क्रेडिट कार्डस आणि किती खरेदी केली त्याची माहिती समोर आली..

शेल्डनच्या ब्लडलाईन या कादंबरीमध्ये मॅक्स हॉर्नंग हा डिटेक्टिव्ह ही माहिती कम्प्युटरवरुन शोधून काढतो. या कादंबरीत शेल्डन म्हणतो, “आजच्या जगात प्रायव्हसी हा भ्रम आहे.. प्रत्येक नागरिक हा कम्प्युटरसमोर उघडा पडलेला आहे”

  • नीलांबरी जोशी

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *