
नोटबंदी काळातील संशयास्पद व्यवहारांमधील सहभाग प्रकरणी एसएफआयओने सनदी लेखापालला केली अटक
मुंबई, दि. १८: कंपनी व्यवहार मंत्रालयाअंतर्गत एसएफआयओ अर्थात गंभीर फसवणुकीच्या गुन्ह्यांचा तपास करणाऱ्या कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी विशिष्ट गोपनीय माहितीच्या आधारे मुंबई पोलीस आयुक्तांच्या सहकार्याने, १३.०९.२०२३ रोजी व्यवसायाने सनदी लेखापाल असलेले नलिन प्रभात पांचाळ यांना नित्यंक इन्फ्रापॉवर अँड मल्टीव्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या खटल्यासंदर्भात बजावण्यात आलेल्या समन्सला प्रतिसाद न दिल्याबद्दल अटक केली.
एसएफआयओच्या अधिकाऱ्यांनी नित्यंक इन्फ्रापॉवर अँड मल्टीव्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या नोटबंदी(विमुद्रीकरण) काळातील व्यवहारांची चौकशी केली आणि कंपनी आणि व्यक्तींविरोधात हैदराबाद (विशेष न्यायालय) च्या विशेष न्यायालय VIII अतिरिक्त महानगर दंडाधिकारी सत्र न्यायाधीश यांच्यासमोर खटला दाखल केला. समन्स जारी करूनही पांचाळ हैदराबाद येथील विशेष न्यायालयासमोर हजर राहू शकले नाहीत. हैदराबाद विशेष न्यायालयाने निर्गमित केलेल्या अजामीनपात्र अटक वॉरंटनुसार त्यांना अटक करण्यात आली. १३.०९.२०२३ रोजी हैदराबाद येथील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले आणि त्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.