Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

आशिष शेलार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना भेट दिले स्वलिखित “मुद्देसूद २” पुस्तक

आशिष शेलार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना भेट दिले स्वलिखित “मुद्देसूद २” पुस्तक

मुंबई: गेल्या पाच वर्षांत शिवसेना-भाजप युतीत अनेक कुरबुरी झाल्या. एकमेकांवर शेलक्या भाषेत आरोपही झाले. अगदी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत युती तुटते की काय अशीही परिस्थिती निर्माण झाली होती. या भांडणात भाजपकडून आरोप करण्यात अग्रेसर राहिले ते आशिष शेलार. लोकसभा निवडणुकांपूर्वी शिवसना भाजपने एकमेकांविरोधात उपसलेल्या तलवारी म्यान केल्या त्या नंतर आशिष शेलारही तसे शांत झाले. आज त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची मातोश्रीवर सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी विधानसभेतील विविध विषयांवरील भाषणांचे संकलन असलेले “मुद्देसूद २” हे पुस्तक भेट दिले. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *