Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

इंदापूर, चिपळूण, संगमेश्वर तालुक्यातील पर्यटनक्षेत्र विकासासाठी आवश्यक निधी देण्याचे  उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आश्वासन

इंदापूर, चिपळूण, संगमेश्वर तालुक्यातील पर्यटनक्षेत्र विकासासाठी आवश्यक निधी देण्याचे  उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आश्वासन

मुंबईदि. ३१: पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील मालोजीराजे भोसले यांची गढीहजरत चाँदशाहवली बाबांचा दरगाहरत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथील स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारकश्री मार्लेश्वर देवस्थान आदी क्षेत्रांना ऐतिहासिकअध्यात्मिकपुरातत्वीय वारसा आहे. या क्षेत्रांचा विकास करताना पुरातत्वीय महत्वऐतिहासिक सौंदर्य जपण्यात यावे. नवीन बांधकाम करताना ते शेकडो वर्षांपूर्वीच्या मूळ वास्तूशी मिळते-जुळते असावे. तसेच इंदापूरचिपळूण, संगमेश्वर तालुक्यातील पर्यटनक्षेत्रांचा परिपूर्ण आराखडा सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. या विकासकामांसाठी आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करण्यात येईलअसा विश्वासही त्यांनी दिला. प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत पुणे जिल्ह्याच्या इंदापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यातील ऐतिहासिक स्थळेदेवस्थाने आणि पर्यटनक्षेत्रांच्या विकासासंदर्भात उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले कीइंदापूर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांच्या गढीचे संवर्धन करुन जुने बुरुजगाव वेसेसह ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन करण्याबरोबरच गढीलगत असणाऱ्या हजरत चाँदशाहवली बाबांच्या दर्गा परिसराचा विकास करण्याचा प्रस्ताव पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने सादर करावा. यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद करण्यात येईल. ही विकासकामे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण करण्याची खबरदारी घ्यावी. विकासकामे करताना त्या परिसराचावास्तूचा ऐतिहासिकपुरातत्व महत्व जपले जावेयाची काळजी घ्यावी. गढीच्या परिसरात अतिक्रमणे असल्यास ती तातडीने हटविण्याची कारवाई करण्याची सूचनाही उपमुख्यमंत्री पवार यांनी  केली.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले कीकोकणाला निसर्गाचे वरदान लाभले आहे. त्यामुळे पर्यटनाच्या माध्यमातून या परिसरात रोजगार निर्मिती करण्यास मोठा वाव आहे. त्याचा विचार करुनच कोकणातल्या पर्यटनस्थळांचा विकास करावा. प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत चिपळूण तालुक्यातील पेढे येथील सवतसडा धबधबाचिपळूण गुहागर बायपास रोडवरील पुरातन बौद्ध लेणी (दगोबाची लेणी) सुशोभीकरण करणेसंगमेश्वर तालुक्यातील मार्लेश्वर देवस्थान परिसरकसबा येथील स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारकश्री टिकलेश्वर मंदिरश्री क्षेत्र मार्लेश्वर येथे आर्च ब्रिज बांधणेसुशोभीकरण करणे ही कामे करण्याबाबत वास्तूविशारदांची नेमणूक करण्यात यावी. पर्यटकांसाठी मूलभूत सुविधा देण्याबरोबरच त्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी दिल्या.

बैठकीला आमदार दत्तात्रय भरणेआमदार शेखर निकमवित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीरमहसूल विभागाचे मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. एच. गोविंदराजनियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजयउपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशिष शर्मापर्यटन विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगीपर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटीलदूरदृश्यप्रणालीद्वारे पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुखरत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंहपुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर. एस. चव्हाणनगरपालिका इंदापूरचे मुख्याधिकारी राम कापरेवास्तुविशारद स्मिता तावरेरत्नागिरीचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकरइंदापूर येथील बाळासाहेब ढवळेभारत जामदारआझाद पठाणओमकार साळुंके आदी उपस्थित होते.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *