शपथविधी नंतर आदित्य ठाकरे यांनी केलेल्या कृतीचे साऱ्यांनी केले कौतुक
मुंबई: आज महाराष्ट्रातील नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा विधिमंडळात आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांनीही आमदारकीची शपथ घेतली. यावेळी त्यांनी त्यांच्या एका कृतीने साऱ्यांना अचंबित करून टाकले. शपथविधी पार पडल्यावर त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या जागेजवळ जाऊन वाकून अभिवादन केलं. यावेळी बाजूला बसलेले माजी मंत्रीही एक क्षण अवाक झाले आणि त्यांनाही स्मितहास्य करावं लागलं.
काल मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देताना देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर बोचरी टीका केली होती. ज्यात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही गंभीर टीका केली होती. पण आज या गोष्टीची कटुता मनात न ठेवता आदित्य ठाकरे यांनी दाखवलेल्या सुसंस्कृतपणाची चर्चा सर्व आमदारांत रंगली.