“शिष्यांच्या मुखातून “गुरु” तर बोलत नाही ना?” कालच्या वक्तव्यावरून आशिष शेलारांचा आव्हाड-राऊत दोघांना टोमणा
मुंबई: गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या कालच्या वक्तव्यावरून सुरू झालेल्या वादंगात आता भाजप नेते आमदार ऍड. आशिष शेलार यांनी उडी घेतली आहे. याबाबत आज सकाळी एक ट्विट करत जितेंद्र आव्हाड व संजय राऊत यांना टोमणा हाणत ते म्हणाले की, “माजी पंतप्रधान इंदिराजी गांधी यांचे अंडरवर्ल्डचे संबंध होते, असे संजय राऊत म्हणतात…इंदिरांजीनी लोकशाहीचा गळा घोटला,असे जितेंद्र आव्हाड म्हणतात..
दोघांची ओळख ही बारामतीकर गुरुंचे पट्टशिष्य!
मग..
शिष्यांच्या मुखातून “गुरु” तर बोलत नाही ना?
आपले जुने हिशेब चुकते तर करीत नाही ना?”
