नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि राष्ट्रीय नागरी नोंद पुस्तिका यांच्यामुळे कोणत्याही विशिष्ट धर्माच्या लोकांना धोका नाही – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
नवी दिल्ली: नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि राष्ट्रीय नागरी नोंद पुस्तिका यांच्यामुळे कोणत्याही विशिष्ट धर्माच्या लोकांना धोका नाही, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं रामलीला मैदानावर भाजपानं आयोजित केलेल्या मेळाव्यात बोलत होते.
शेजारच्या देशांमधून परगंदा होऊन भारतात आश्रयाला आलेल्या लोकांना नागरिकत्व देणं हा या कायद्याचा उद्देश आहे. पाकिस्तान अल्पसंख्याकांच्या विरोधात पक्षपाती वर्तन करत आहे, हे उघड करण्याची संधी या निमित्तानं मिळाली, मात्र विरोधकांच्या राजकारणामुळे ती गमवावी लागली, असं मोदी म्हणाले.
(सौजन्य – AIR)
