Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

दादर परिसरातील उच्चभ्रू इमारतीत ‘स्पा’ च्या नावाखाली चालणाऱ्या वेश्या व्यवसायाचा अमली पदार्थ विरोधी पथकाने केला पर्दाफाश

दादर परिसरातील उच्चभ्रू इमारतीत ‘स्पा’ च्या नावाखाली चालणाऱ्या वेश्या व्यवसायाचा अमली पदार्थ विरोधी पथकाने केला पर्दाफाश

दादर: मुंबईतील दादर परिसरातील उच्चभ्रू वसाहतीत असलेल्या एका इमारतीत स्पा सेंटर च्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवले जात होते. या बाबतच्या तक्रारी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र वार्ताकडेही आल्या होत्या. अखेर मुंबई अमली पदार्थ विरोधी पथकाने शुक्रवारी या ठिकाणी धाड मारत या सेक्स रॅकेट चा पर्दाफाश केला.

दादर पोलीस स्टेशन च्या हद्दीत येणाऱ्या प्रभादेवी परिसरातील या उच्चभ्रू रहिवासी इमारतीत मोठे राजकारणी, खेळाडू असेच एक माजी पोलीस अधिकारी राहतात हे विशेष. या ठिकाणी “स्पा” च्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवला जात होता. पोलिसांनी धाड टाकत नऊ मुलींची सुटका केली तर सलीम शेख या मुख्य आरोपीला अटक केली. त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. “पिटा” कायद्यान्वये ही कारवाई करण्यात आली असून. हे स्पा सांभाळणाऱ्या मुलींनासुद्धा नोटीस बजावण्यात आली असून त्यांनाही अटक केली जाऊ शकते. या रॅकेटचा पर्दाफाश झाल्यामुळे स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. अशाच प्रकारचे स्पा, मसाज पार्लर आणि लॉज नवी मुंबई परिसरातही राजरोस चालू आहेत.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *