Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

नागरिकत्व सुधारणा कायदा मुस्लिम आणि अल्पसंख्याकांच्या विरोधात नाही – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

नागरिकत्व सुधारणा कायदा मुस्लिम आणि अल्पसंख्याकांच्या विरोधात नाही – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

नागपूर: नागरिकत्व सुधारणा कायदा मुस्लिम आणि अल्पसंख्याकांच्या विरोधात नाही असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे ते आज नागपूरात या कायद्याच्या समर्थनार्थ भाजपा, विश्व हिंदू परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि लोकाधिकार मंचाच्या कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या मेळाव्यात बोलत होते.

हा कायदा अल्पसंख्यांकांच्या बाबतीत कसालाही भेदभाव करत नाही, विरोधी पक्ष मतपिढीच्या राजकारणासाठी अल्पसंख्याकांच्या मनात भिती निर्माण करण्यासाठी चुकीचा प्रचार करत आहेत, असं ते म्हणाले.सर्व धर्मांचा सारखाच सन्मान करणं हा भारतीय संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे, विधानसभेतलेविरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीसही या रॅलीत सहभागी झाले होते.

काही राजकीय पक्ष हेतुतः या कायद्याविषयी गैरसमज पसरवून लोकांमध्ये अस्वथता निर्माण करत आहेत असं फडनवीस यांनी यावेळी सांगितलं.

(सौजन्य – AIR)

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *