आजच्या बैठकीनंतर राष्ट्रवादीच्या आमदारांनी चक्क उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरें सोबत केलं फोटो सेशन
मुंबई: मुंबईतील पवई मधील रेनैसन्स हॉटेल मध्ये मुक्कामाला असलेल्या राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. त्यांच्यासोबत सेनेच्या वतीने आदित्य ठाकरे, संजय राऊत, सुभाष देसाई व एकनाथ शिंदे हेही उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपल्या जवळ बहुमत असून आपलंच सरकार येईल असा विश्वास उपस्थित आमदारांना दिला.
ही बैठक झाल्यानंतर शिवसेना व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी चक्क फोटो सेशनच केलं. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांनी सेल्फी काढून घेतला. यात रोहित पवार, संग्राम जगताप, संदीप क्षीरसागर यांचा प्रामुख्याने समावेश होता.




