Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

Breaking न्युज: अजित पवारांच्या मी राष्ट्रवादीमध्येच विधानावर शरद पवार म्हणाले त्यांचे विधान खोटे, दिशाभूल करणारे

Breaking न्युज: अजित पवारांच्या मी राष्ट्रवादीमध्येच विधानावर शरद पवार म्हणाले त्यांचे विधान खोटे, दिशाभूल करणारे

मुंबई: गेले दोन दिवस ट्विटर वर ऍक्टिव्ह नसलेले कालच्या संबंध दिवसात नॉट रीचेबल राहीलेले राज्याचे काळजीवाहू उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज ट्विटर वर अनेक ट्विट केले. यात सर्वात आधी त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह तसेच भाजपचे देशातील व राज्यातील प्रमुख नेत्यांचे आभार मानले.

पण यानंतर त्यांनी जे दोन ट्विट केले त्यामुळे दुसरा राजकीय भूकंप झाला. या ट्विट मध्ये ते त्यांनी मी राष्ट्रवादी मध्येच आहे आणि राष्ट्रवादीतच राहणार असून शरद पवार हेच आमचे नेते असल्याचे म्हटले आहे. ते पुढे म्हणतात की आमचं भाजप-राष्ट्रवादी युतीचं सरकार पुढील ५ वर्ष महाराष्ट्राला स्थिर सरकार देईल व राज्यातील जनतेच्या विकासासाठी काम करेल.

आपल्या शेवटच्या ट्विट मध्ये तर ते म्हणतात, “ऑल इज वेल” सारं काही ठीक आहे. चिंता करण्याचं काहीच कारण नाही. थोडेसा संयम जरुरी आहे. मी साऱ्यांचा आभारी आहे ज्यांनी मला पाठिंबा दिला.”

यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, “भाजपासोबत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. राष्ट्रवादी ने शिवसेना व काँग्रेस यांच्यासोबत हातमिळवणी करत महाराष्ट्र सरकार स्थापन करण्याचे एकमताने ठरविले आहे. अजित पवार यांचे विधान खोटे, दिशाभूल करणारे आणि खोडसाळ असून समाजात चुकीचा समज पसरविणारे आहे.”

या साऱ्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आमदार फुटू नयेत म्हणून विशेष काळजी घेतली आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *