टी-२० विश्वचषक २०२६: भारताचा ऐतिहासिक विजय; न्यूझीलंडवर ९६ धावांनी मात करत टीम इंडियाची सलग दुसरी ट्रॉफी
अहमदाबाद, दि. ८: : Narendra Modi Stadium नरेंद्र मोदी स्टेडीयम येथे खेळल्या गेलेल्या टी-२० विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात India national cricket team भारतीय क्रिकेट संघाने दमदार कामगिरी करत New Zealand national cricket team न्यूझीलँड वर ९६ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकत इतिहास रचला. विशेष म्हणजे, सलग दोन टी-२० विश्वचषक जिंकणारा भारत हा पहिलाच संघ ठरला आहे.
भारताने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ५ बाद २५५ धावांचा भला मोठा डोंगर उभा केला. या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संपूर्ण संघ १५९ धावांवरच गारद झाला. भारताच्या गोलंदाजांनी अचूक मारा करत किवी फलंदाजांना मोठी भागीदारी उभी करू दिली नाही.
सॅमसन-अभिषेक-ईशानची स्फोटक फलंदाजी
भारतीय डावाची सुरुवात आक्रमक झाली. सलामीवीर Sanju Samson याने दमदार फलंदाजी करत संघाला भक्कम पाया घालून दिला. त्याने केवळ ४६ चेंडूत ५ चौकार आणि ८ षटकारांसह ८९ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. सलग तिसऱ्या सामन्यात त्याने झळकावलेले वेगवान अर्धशतक भारतासाठी महत्त्वाचे ठरले.
सॅमसनने Abhishek Sharma अभिषेक शर्मा सोबत पहिल्या विकेटसाठी ९८ धावांची भागीदारी केली. अभिषेकने केवळ २१ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारांसह ५२ धावा करत न्यूझीलंडच्या गोलंदाजीची अक्षरशः धुलाई केली.
यानंतर सॅमसन आणि Ishan Kishan इशान किशन यांनी दुसऱ्या विकेटसाठी १०५ धावांची भागीदारी रचत भारतीय डाव अधिक भक्कम केला. ईशान किशनने २५ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांसह ५४ धावांची झंझावाती खेळी केली. या तिघांच्या तुफानी फलंदाजीमुळे भारताच्या धावफलकावर अवघ्या आठव्या षटकात शतक तर १५व्या षटकात द्विशतक लागले.
नीशामने लावला ब्रेक, पण भारताचा वेग कायम
न्यूझीलंडकडून James Neesham जेम्स निशम याने १६व्या षटकात तीन फलंदाजांना बाद करत भारताच्या धावगतीला काहीसा ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर Hardik Pandya हार्दिक पांडा आणि Shivam Dube शिवम दुबे यांनी शेवटच्या षटकांत आक्रमक फटकेबाजी करत भारताचा डाव २५५ धावांपर्यंत पोहोचवला.
बुमराह-अक्षरचा घातक मारा
256 धावांच्या प्रचंड लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवातच डळमळीत झाली. भारताचा वेगवान गोलंदाज Jasprit Bumrah जसप्रीत बुमराह आणि फिरकीपटू Axar Patel अक्षर पटेल यांनी अचूक गोलंदाजी करत किवी फलंदाजांना बांधून ठेवले.
सुरुवातीपासूनच विकेट्स पडत राहिल्यामुळे न्यूझीलंडवर दबाव वाढत गेला. मधल्या षटकांत काही प्रयत्न झाले तरी मोठी भागीदारी उभी राहू शकली नाही. अखेर संपूर्ण संघ १५९ धावांवर आटोपला आणि भारताने ९६ धावांनी दणदणीत विजय मिळवला.
भारतीय क्रिकेटसाठी ऐतिहासिक क्षण
या विजयासह भारताने तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकत जागतिक क्रिकेटमध्ये आपली ताकद पुन्हा सिद्ध केली. सलग दोन विश्वचषक जिंकण्याचा विक्रम करत टीम इंडियाने नवा इतिहास घडवला. अहमदाबादच्या स्टेडियममध्ये उपस्थित हजारो चाहत्यांनी या विजयाचा जल्लोष साजरा केला. भारतीय क्रिकेटसाठी हा केवळ विजय नसून अभिमानाचा सुवर्णक्षण मानला जात आहे.
