India's players celebrate with the trophy after winning the ICC Women's Cricket World Cup 2025 one-day international (ODI) final match between India and South Africa at the DY Patil Stadium in Navi Mumbai on November 3, 2025. (Photo by Punit PARANJPE / AFP) / -- IMAGE RESTRICTED TO EDITORIAL USE - STRICTLY NO COMMERCIAL USE -- (Photo by PUNIT PARANJPE/AFP via Getty Images)
महिला संघाने पहिल्यांदाच पटकावलं आयसीसी एकदिवसीय विश्वविजेतेपद
नवी मुंबई, दि. ३: आयसीसी विश्वचषक महिला क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात काल दक्षिण आफ्रिकेवर ५२ धावांनी मात करत भारताने विश्वचषक पटकावला. नवी मुंबईतल्या डी. वाय. पाटील मैदानावर झालेल्या या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. भारताने निर्धारित ५० षटकात ७ बाद २९८ धावा केल्या. शेफाली वर्माने ८७, दिप्ती शर्माने ५८, तर स्मृती मंधानाने ४५ धावा केल्या. ऋचा घोषने ३४ धावांचं योगदान दिलं. या धावसंख्येचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ २७ चेंडू बाकी असतानाच २४६ धावात गारद झाला. भारतातर्फे दिप्ती शर्माने ५, शेफाली वर्माने २, तर श्री चरणीने १ बळी मिळवला. शेफाली वर्मा सामन्यातली सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरली.
विश्वचषक पटकावून ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघावर सर्व थरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतीय महिला क्रिकेट संघाचं अभिनंदन केलं आहे. या विश्वविजेत्या संघाला भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ५१ कोटी रुपयांचं रोख पारितोषक जाहीर केलं आहे.
Source – AIR
