मतचोरी आणि मतदार याद्यांमधे घोळ असल्याचा नेत्यांचा आरोप
मुंबई, दि. १: मतचोरी आणि मतदार याद्यांमधील घोळाचा आरोप करत महाविकास आघाडीनं आज मुंबईत सत्याचा मोर्चा काढला आहे. या मोर्चात जेष्ठ नेते शरद पवार यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे, खा. सुप्रिया सुळे, आ. सतेज पाटील, आ. विजय वडेट्टीवार, आ. आदित्य ठाकरे सहभागी झाले आहेत. सोबतच डाव्या पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते देखील मोर्चात सहभागी झाले.
आघाडीतल्या पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं मोर्चात सहभागी झाले आहेत. सदोष मतदार याद्यांची दुरुस्ती झाल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेतल्या जाऊ नयेत अशी महाविकास आघाडीची मागणी आहे.
