पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या भावनांबद्दल आदर व्यक्त करत दिला आत्मियतापूर्ण प्रतिसाद
नवी दिल्ली, दि. ६: भारत आणि अमेरिका यांच्यात अतिशय सकारात्मक, दूरदृष्टीपूर्ण, व्यापक आणि जागतिक धोरणात्मक भागीदारी आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उभय देशांमधल्या संबंधांबद्दल केलेल्या विधानावर त्यांनी आज समाज माध्यमावर प्रतिक्रिया दिली आहे.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारत आणि अमेरिकेतील संबंधांविषयी व्यक्त केलेल्या भावना आणि सकारात्मक नोंदीचा आपण मनापासून आदर करत असल्याचे आणि त्याला आत्मियतापूर्ण प्रतिसाद देत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. भारत आणि अमेरिकेतील भागीदारी ही एक अत्यंत सकारात्मक आणि दूरदृष्टीपूर्ण, सर्वसमावेशक तसेच जागतिक धोरणात्मक भागीदारी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर लिहिलेला संदेश
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या भावना आणि त्यांनी दोन्ही देशांच्या संबंधांची घेतलेली सकारात्मक नोंद याचा मी मनापासून आदर करतो आणि त्यांच्या भावनांना आत्मियतापूर्ण प्रतिसाद देतो. भारत आणि अमेरिकेतील भागीदारी ही एक अत्यंत सकारात्मक आणि दूरदृष्टीपूर्ण, सर्वसमावेशक तसेच जागतिक धोरणात्मक भागीदारी आहे.
भारत आणि अमेरिका यांच्यातले संबंध विशेष असून त्याबाबत चिंता करण्यासारखं काही नाही असं ट्रम्प यांनी काल प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं होतं. नरेंद्र मोदी हे एक श्रेष्ठ प्रधानमंत्री असून ते आपले कायमच चांगले मित्र राहतील, असंही ट्रम्प म्हणाले.
