राज्यात सायंकाळी ६ वाजेपर्यंत ६५.११ टक्के मतदान; कोल्हापूर-गडचिरोली जिल्ह्यांत विक्रमी मतदान
मुंबई, दि. २१ : राज्यात काल संपन्न झालेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठीच्या मतदानाची अंतिम टक्केवारी आता समोर आली आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार काल सायंकाळी ६ वाजेपर्यंत एकूण ६५.११ टक्के मतदान झाले असून कोल्हापूर जिल्ह्यात सर्वात जास्त संख्येने मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात एकूण ७६.२५ टक्के तर त्या खालोखाल गडचिरोली जिल्ह्यात ७३.६८ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :
अहमदनगर – ७१.७३ टक्के,
अकोला – ६४.९८ टक्के,
अमरावती – ६५.५७ टक्के,
औरंगाबाद- ६८.८९ टक्के,
बीड – ६७.७९ टक्के,
भंडारा – ६९.४२ टक्के,
बुलढाणा – ७०.३२ टक्के,
चंद्रपूर- ७१.२७ टक्के,
धुळे – ६४.७० टक्के,
गडचिरोली – ७३.६८ टक्के,
गोंदिया – ६९.५३ टक्के,
हिंगोली – ७१.१० टक्के,
जळगाव – ६४.४२ टक्के,
जालना – ७२.३० टक्के,
कोल्हापूर – ७६.२५ टक्के,
लातूर – ६६.९२ टक्के,
मुंबई शहर- ५२.०७ टक्के,
मुंबई उपनगर -५५.७७ टक्के,
नागपूर – ६०.४९ टक्के,
नांदेड – ६४.९२ टक्के,
नंदुरबार- ६९.१५ टक्के,
नाशिक – ६७.५७ टक्के,
उस्मानाबाद – ६४.२७ टक्के,
पालघर – ६५.९५ टक्के,
परभणी – ७०.३८ टक्के,
पुणे – ६१.०५ टक्के,
रायगड – ६७.२३ टक्के,
रत्नागिरी – ६४.५५ टक्के,
सांगली – ७१.८९ टक्के,
सातारा – ७१.७१ टक्के,
सिंधुदुर्ग – ६८.४० टक्के,
सोलापूर – ६७.३६ टक्के,
ठाणे – ५६.०५ टक्के,
वर्धा – ६८.३० टक्के,
वाशिम – ६६.०१ टक्के,
यवतमाळ – ६९.०२ टक्के मतदान झाले आहे.
