आरक्षण गेलं खड्ड्यात! पदवीपर्यंत सर्वच जातीच्या विध्यार्थ्यांना शिक्षण मोफत करा! : खा. छत्रपती संभाजीराजे संतापले
मराठा आरक्षणाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागत नसल्या कारणाने मनाजोगत्या कॉलेज ला प्रवेश न मिळाल्याने उस्मानाबाद मधील एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना नुकतीच घडली. या घटनेमुळे व्यथित होऊन खा. छत्रपती संभाजीराजे यांनी आरक्षण गेले खड्ड्यात असे म्हणत ट्विटर ट्विट करत वर संताप व्यक्त केला आहे.
खा. संभाजीराजे आपल्या ट्विट मध्ये म्हणाले की, “उस्मानाबाद येथील देवळाली गावातील मराठा समाजातील युवक अक्षय शहाजी देवकर याने आपले आयुष्य संपवले आहे. नुकत्याच झालेल्या दहावीच्या परिक्षेत त्याला ९४% गुण मिळून सुध्दा चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला नव्हता!”
समाजाचे अग्रणी म्हणून आपण सर्वांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. सरकार मधले नेते असोत किंवा विरोधी पक्षातले. ‘योग’ करत आपण दोन मिनिट शांत बसून विचार करू, की का म्हणून आपण राजकारणात आहोत?? आपल्याला नेमकं काय मिळवायचंय?? असेही ते म्हणाले.
पुढे व्यथित होत ते म्हणाले, भाषणात बोलताना देशहित समाजहिताच्या गोष्टी आपण करत असतो. परंतु वास्तवात आपलं आचरण त्याप्रकारचं आहे कां? की उगाच मुह में राम, बगल में सूरी असा प्रकार चालू आहे? नाहीतरी आज एवढा हुशार बालक आत्महत्येला प्रवृत्त होतोच कसा? त्याच्या आयुष्याची तर खरी सुरुवात होती.
भाषणात बोलताना देशहित समाजहिताच्या गोष्टी आपण करत असतो. परंतु वास्तवात आपलं आचरण त्याप्रकारचं आहे कां? की उगाच मुह में राम, बगल में सूरी असा प्रकार चालू आहे? नाहीतरी आज एवढा हुशार बालक आत्महत्येला प्रवृत्त होतोच कसा? त्याच्या आयुष्याची तर खरी सुरुवात होती.
शेवटी ते म्हणाले की, “आरक्षण गेलं खड्ड्यात! पदवीपर्यंत सर्वच जातीच्या विध्यार्थ्यांना शिक्षण मोफत करा!”
