शिवसेना पक्ष हा वर्धिष्णू झाला पाहिजे, मोठा झाला पाहिजे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई: काल शिवसेनेच्या ५३ व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिवसेनेतर्फे आमंत्रित करण्यात आले होते.
उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व शिवसैनिकांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे जल्लोषात स्वागत केले. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला म्हणाले की, “शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त माझी उपस्थिती याबद्दल अनेकांच्या मनात प्रश्नचिन्ह होते. पण मी ठाकरे यांचा आशिर्वाद घेण्यासाठी आणि शिवसैनिकांकडून ऊर्जा घेण्यासाठी आलो आहे.” शिवसेना-भाजप युतीबाबत बोलताना ते म्हणाले “शिवसेना-भाजप युती ही भारतात सर्वात जास्त काळ चाललेली युती आहे. भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांच्या मना-मना मध्ये शिवसेना-भाजप युती व्हावी असे होते. देशात व महाराष्ट्रात युतीला मिळालेलं यश हे अभूतपूर्व आहे. शिवसेनेचे शिवसैनिक आणि भाजपचे कार्यकर्ते हे या विजयाचे खरे शिल्पकार आहेत. आपण सारे भगव्यासाठी एकत्र आहोत. आपलं हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे”.
पुढे शिवसेनेला शुभेच्छा देताना ते म्हणाले हिंदुहृदयसम्राट श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या मध्ये राष्ट्रीयत्वाचे बीज रोवले आहे. शिवसेना पक्ष हा वर्धिष्णू झाला पाहिजे , मोठा झाला पाहिजे.”
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भाषणातील काही ठळक मुद्दे
• शिवसेनेच्या कार्यक्रमात आल्यावर घरी आल्यासारखे वाटते, आपण भगव्या ध्वजासाठी लढणारे आपण आहोत.
• जनता आगामी विधानसभा निवडणुकीत युतीला मताधिक्याने विजयी करतील असा विश्वास केला व्यक्त.
• शेवटच्या घटकांपर्यंत विकास पोहचवण्याचे ध्येय आहे.
• आम्ही निवडणुकांसाठी नाही, तर राज्याच्या आणि देशाच्या विकासासाठी एकत्र आलो आहोत.
• शिवसेना पक्ष वाढला पाहिजे, शिवसेना मोठी झाली पाहिजे अशा दिल्या शुभेच्छा.
• राष्ट्र मोठे करण्यासाठी महाराष्ट्राला मोठे करायला हवे, त्यासाठी आपण काम करत आहोत.
• आमचे हिंदुत्व संकुचित नाही, आमचे हिंदुत्व राष्ट्रीयत्व आहे, प्रत्येक जातीचे, भाषेचे याला बंधन नाही
• मुख्यमंत्री कोण ही चर्चा प्रसारमाध्यमांना करू द्या, आपण विकासासाठी काम करू
• आगामी काळात राज्यात दुष्काळ येणार नाही, यासाठी काम करायचे आहे.
• देशात ताजमहाल उभा राहत असताना जाणता राजा सामान्यांचे अश्रू पूसत होता, ती प्रेरणा आमच्यासमोर आहे
• आपली प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज आहेत.
• उद्धव ठाकरे आणि आम्ही विकासाचे काही निर्णय घेतले आहे, ते योग्यवेळी जाहीर करू.
• शिवसेनाप्रमुखांचे महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम करायचे आहे.
