भंडाऱ्याच्या पोटनिवडणुकीत जनतेने गडकरी-फडणवीसांंचं पार्सल परत पाठवलं – नाना पटोले
नागपूर: काँग्रेस उमेदवार नाना पटोले यांनी आज नागपूर शहरात बाईक रॅली काढली. यावेळी त्यांनी भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांच्यावर निशाणा साधला. नितीन गडकरींनी निवडणूक हरल्यानंतर इतरत्र कुठे ही जाऊ नये, त्यांनी नागपुरातच राहावे. आम्ही त्यांना राज्यसभेवर पाठवू, अशा शब्दांत नाना पटोले यांनी नितीन गडकरी यांच्यावर जोरदार टीका केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टिकेल प्रतिउत्तर देताना, मी भंडाऱ्याचा पार्सल नाही. भंडाऱ्याच्या पोटनिवडणुकीत गडकरी, फडणवीस यांची पार्सल तिथल्या जनतेने परत पाठवली. गडकरींचं पार्सल पुढे इंदूरला जाईल. त्यामुळे पार्सल कोण हे यंदाच्या निवडणूकीत जनता ठरवेल.
२०१४ च्या निवडणूकीत भाजपच्या तिकीटावर भंडारा-गोंदिया मतदारसंघातून पटोले निवडून आले होते. मात्र यंदा नाना पटोले काँग्रेसतर्फे रिंगणात उतरत त्यांची लढत भाजपचे विद्यमान खासदार नितीन गडकरी यांच्याविरोधात आहे.
