Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

‘तुला पहाते रे’ मालिकेच्या निर्मात्यांना निवडणूक आयोगाची नोटीस, मोदींचा प्रचार भोवला

‘तुला पहाते रे’ मालिकेच्या निर्मात्यांना निवडणूक आयोगाची नोटीस, मोदींचा प्रचार भोवला

लोकसभा निवडणुकीचा ज्वर जसजसा वाढत जातोय तसतसे त्या संदर्भातील दावे-प्रतिदावे दृष्टीस पडत आहेत. त्याच झालं असं की काँग्रेस ने काही मराठी व हिंदी मालिकांची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे. ‘भाभीजी घर पर है’, ‘कुंडली भाग्य’, ‘तुला पाहते रे’ आणि ‘तुझसे है राबता’ या मालिका केंद्र सरकारच्या योजनांच्या नावांचा उल्लेख करून पंतप्रधान मोदी व भाजप चा प्रचार करत आहेत अशी तक्रार काँग्रेस तर्फे निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. या तक्रारीची दखल घेत आयोगाने ‘तुला पाहते रे’ मालिकेच्या निर्मात्यांना संबंधित तक्रारी संदर्भात स्पष्टीकरण देण्यासाठी २४ तासांचा अवधी दिला आहे.

काँग्रेस नेते सचिन सावंत यांनीही दोन दिवसांपूर्वी एक ट्विट करून भाजपवर टीका केली होती. ते म्हणाले, “भाजप दिवसागणिक खालच्या दर्जाचं राजकारण करत आहे. आता तर मालिकांचाही वापर प्रचार करण्यासाठी केला जात आहे. भाजप च्या पायाखालची जमीन आता सरकत आहे. आता मायावी तंत्रांचा वापर भाजप करत आहे. निवडणूक आयोगाने स्वतः याची चौकशी करायला हवी होती पण आता आम्ही याबद्दल निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत”

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *