“प्रगत आणि उदयोन्मुख अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारतीय रुपया चांगला टिकून आहे” – आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास
मुंबई, दि. २२ : आपली मूलभूत तत्त्वे मजबूत, लवचिक आणि अखंड असल्याने प्रगत आणि उदयोन्मुख अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारतीय रुपया चांगला टिकून असल्याचं मत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केलं. ते आज मुंबईत बँक ऑफ बडोदाच्या वार्षिक बँकिंग परिषदेत बोलत होते.
पुनर्प्राप्ती हळूहळू मजबूत होत असुन, चालू खात्यातील तूट माफक आहे. महागाई स्थिर होत असुन आर्थिक क्षेत्राकडे सध्या मुबलक भांडवलदार आहेत. बाह्य कर्ज आणि जीडीपीचे प्रमाण कमी होत आहे. परकीय चलनाचा साठा पुरेसा असल्याचं दास यांनी सांगितलं.
आयात आणि कर्ज सेवा आवश्यकता आणि पोर्टफोलिओ आउटफ्लोमुळे मागणीच्या तुलनेत बाजारात परकीय चलन पुरवठा कमी आहे. तसच विदेशी चलनात तरलता असल्याची खात्री करण्यासाठी रिझर्व्ह बँके बाजारात यूएस डॉलर्सचा पुरवठा करत आहे. शक्तिकांत दास यांनी आश्वासन दिलं की, आम्ही विदेशी चलन बाजाराशी संलग्न राहू आणि रुपयाची पातळी त्याच्या मूलभूत तत्त्वांशी सुसंगत असल्याचे सुनिश्चित करू असं आश्वासन दास यांनी दिलं. रिझर्व्ह बँकेने रूपयाचे मुल्य निश्चित केलं नसलं तरी रूपयामध्ये योग्य परिवर्तन करण्याचा त्यांनी पुनरुच्चार केला.
