भाजपाने मुंबईकरांची माफी मागावी : जितेंद्र आव्हाड
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळचा पादचारी पुल कोसळण्याच्या घटनेला पादचारी जबाबदार आहेत, असे धक्कादायक विधान करणाऱ्या भाजप प्रवक्त्या संजू वर्मा ह्यांनी मुंबईकरांची माफी मागावी, अशी मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून वर्मा यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
‘‘मुंबईत ब्रीज पडला जबाबदारी कोणाची?, ब्रीजचे ऑडीट केले होते? असा प्रश्नही त्यांनी यावेळी विचारला आहे. दुर्घटनेमध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना त्वरीत २५ लाख रुपयांची मदत करा. भाजपचे प्रवक्ते म्हणाले की, ही नैसर्गिक आपत्ती आहे आणि ब्रीज पडण्याची जबाबदारी पादचाऱ्यांवरच आहे. त्या प्रवक्त्यांनी आणि भाजपने मुंबईकरांची माफी मागावी. तसेच रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा’’ असे ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.
मुंबईत ब्रीज पडला जबाबदारी कोणाची ?
ब्रीज चे ऑडीट केले होते ?
दुर्घटनेमध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना त्वरीत २५ लाख रुपयांची मदत करा.
भाजपाचे प्रवक्ते म्हणाले की, ब्रीज पडण्याची जबाबदारी
पादचा-यांवरच आहेबेशरम प्रवक्त्यांनी आणि भाजपाने मुंबईकरांची माफी मागावी. pic.twitter.com/rnWFDvynxB
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 14, 2019
