Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

आलिया भट्ट झाली २६ वर्षांची, जाणून घ्या तिच्याविषयी

आलिया भट्ट झाली २६ वर्षांची, जाणून घ्या तिच्याविषयी

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आज तिचा २६ वा वाढदिवस साजरा करतेय. आलिया महेश भट्ट हीचा जन्म १५ मार्च १९९३ रोजी मुंबईत झाला.
१९९९ मध्ये अक्षय कुमार व प्रीती झिंटा स्टारर ‘संघर्ष’ या चित्रपटात आलिया बालकलाकार म्हणून झळकली. २०१२ मध्ये करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द ईअर’ या चित्रपटातून तिने बॉलिवूड डेब्यू केला. ह्या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. तिने टू स्टेट , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा कि दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स व बद्री की दुलहनिय ह्या चित्रपटात उल्लेखनीय काम केल आहे. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब ह्या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

२०१२- ‘स्टुडंट ऑफ द ईअर
२०१४- हायवे
२०१४- टू स्टेट
२०१५- शानदार
२०१५- हम्पटी शर्मा की दुल्हनीया
२०१६- कपुर अँन्ड सन्स
२०१६- उडता पंजाब

येत्या १७ एप्रिल रोजी आलिया चा ‘कलंक’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *