भारतीय हवामान विभागाची माहिती
केरळ, दि.३: नैर्ऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळच्या दक्षिण भागात झालं असल्याचं भारतीय हवामानशास्त्र विभागानं जाहीर केलं आहे. यापूर्वीचा अंदाज मानसून १ जूनला केरळात दाखल होईल असा होता.
दोन दिवस विलंबाने त्याचं आगमन झालं. केरळ किनारपट्टीवर मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे. यंदा देशात सरासरी पर्जन्यमान साधारण राहील असं हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी सांगितलं.
गेली दोन वर्ष मान्सून काळात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला होता. येत्या १० तारखेपर्यंत मान्सून राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे.
दरम्यान येत्या २-३ तासात जालना, परभणी, हिंगोलीमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
