गौतम गंभीर भाजपच्या वाटेने…
भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू गौतम गंभीर भाजप पक्षातून दिल्लीमध्ये लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर येत आहे.
डिसेंबर २०१८ मध्ये गंभीरने क्रिकेटमधून स्वइच्छने निवृती घेतली होती. आता गंंभीर राजकारणाच्या दिशेने वाटचाल करण्याच्या तयारीत आहे. गेल्या काही दिवसांपासून तो दिल्लीच्या राजकारणावर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करत आहे. मागील काही दिवसापासून गंभीर राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगत होती.
भारत सरकारने २००८ साली अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले होते. गौतम गंभीर भारतीय संघाकडून १५ वर्ष क्रिकेट खेळला आहे. त्याने त्याच्या कारकिर्दीत ५८ कसोटी आणि १४७ एकदिवसीय सामने खेळले आहे. एकदिवसीय सामन्यात त्याने ५२३८ धावा केल्या, ज्यामध्ये त्याने ११ शतक लगावले आहेत. तर कसोटी सामन्यात नऊ शतक लगावत ४१५४ धावा केलेत. राजकीय मैदानात गंभीर काय कामगिरी करतो? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
