Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

दुसऱ्यांची पोरं धुणी भांडीसाठी वापरून घेत नाही मी, उद्धव ठाकरेंचा शरद पवारांना टोला

दुसऱ्यांची पोरं धुणी भांडीसाठी वापरून घेत नाही मी, उद्धव ठाकरेंचा शरद पवारांना टोला

आदित्य ठाकरेंच्या निवडणूक लढवण्याबद्दलच्या प्रश्नाला पत्रकारांना उत्तर देताना मी माझ्या मुलाबरोबर इतरांच्या मुलाचेही लाड करतो. इतरांची पोर मी धुणी भांडी करण्यासाठी वापरत नाही असे सांगून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर तिरकस टीका केली. भाजपमध्ये नुकताच प्रवेश केल्यानंतर डॉ. सुजय विखे पाटील यांनी आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

शिवसेना – भाजप कडून एकमेकांना कोणताच दगाफटका होणार नाही, अशी हमी यावेळी उद्धव ठाकरेंनी पत्रकारांशी बोलताना दिली.

लोकसभा उमेदवारांची यादी तयार झाली आहे. एक-दोन दिवसात शिवसेना आपली यादी जाहीर करणार आहे. सर्वच्या सर्व जागा जिंकण्याचा प्रयत्न युती नक्कीच करेल, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. पुढे जालन्याच्या जागेवरील तिढ्याबाबत बोलताना ते म्हणाले कि ते माझ्याकडे येतील आणि समोरासमोर बोलणं होईल. युतीत मिठाचा खडा कोणीच टाकू शकत नाही.

शरद पवार यांनी माढ्यातून माघार घेतली यावर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, ‘हे सगळं पवारांच्या नितीला शोभेल असंच आहे. जसं आम्ही म्हणतो की जे आम्ही बोलतो ते करून दाखवतो आणि ते जे बोलतात त्याच्या नेमकं उलटं समजायचं असतं’, असे उद्धव ठाकरे म्हणाले. शरद पवार हे अष्टपैलू नेते म्हणून त्यांची ख्याती राज्यात आहे. ज्योतिषी म्हणून त्यांची नवीन ओळख कधी निर्माण झाली हे मला माहिती नाही.

शिवसेनाप्रमुखांनी माझ्यावर कधीही कोणतही बंधन घातलं नव्हतं त्याचप्रमाणे मी सुद्धा आदित्यवर कोणतही बंधन घातलेलं नाही. आदित्य सध्या तरी निवडणूक लढवणार नाही. पण भविष्यात निवडणूक लढवायची की नाही ते तो स्वत:हा आणि शिवसैनिक ठरवतील. असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *