मनसेच्या अंबरनाथ पालिका कर्मचाऱ्यांसाठीच्या आंदोलनाला अखेर यश, मागण्या मान्य
वेळेवर पुरवणी पगार न काढणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अकाली निधन पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना त्वरीत कामावर रुजू करावे, कर्मचाऱ्यांना सर्व सुविधा निर्माण करून द्याव्यात तसेच लवकरच सातवा वेतन आयोग शासन निर्णयानुसारच लागू करण्यात यावा अशा आपल्या विविध मागण्यांसाठी अंबरनाथ नगरपालिकेतील द्वितीय व तृतीय श्रेणीतील कर्मचारी २७ फेब्रुवारी पासून कामबंद आंदोलनासाठी बसले होते.
अखेर नगरपालिकेने त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून, अंबरनाथ नगरपालिकेतील कार्मचाऱ्यांनी आपले कामबंद आंदोलन आज मागे घेतले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण महानगरपालिका कामगार कर्मचारी सेना अध्यक्ष संदीप देशपांडे, मनसे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली, मनसे अंबरनाथ कामगार सेना अध्यक्ष सूर्यकांत अनार्थे , कार्याध्यक्ष धनंजय गुरव, सरचिटणीस समीर मयेकर यांच्या सहका-र्याने अंबरनाथ नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला यश मिळाले आहे.

