Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

बॉलिवूडचा सिंघम अभिनेता अजय देवगण याचा आज ५० वा वाढदिवस

बॉलिवूडचा सिंघम अभिनेता अजय देवगण याचा आज ५० वा वाढदिवस, जाणून घ्या त्याच्याविषयी

अजय देवगण याचा जन्म २ एप्रिल १९६९ मध्ये दिल्ली येथे देवगण या पंजाबी परिवारात झाला. त्यांचे जन्म नाव विशाल वीरू देवगण आहे. त्यांचे वडील वीरू देवगण भारतीय चित्रपटाचे एक दिग्गज एक्शन डायरेक्टर आणि फिल्म प्रोडयुसर तर आई विणा देवगण ह्या चित्रपट निर्माती आहेत. अजय देवगण याने आपले शालेय शिक्षण जूहू येथील सिल्वर बिच हायस्कूल आणि महाविद्यालयीन शिक्षण मिठीबाई काॅलेज, मुंबई मधून पूर्ण केले.

प्रसिध्द चित्रपट अभिनेत्री काजोल हिच्याशी अजयने १९९९ मध्ये महाराष्ट्रीय पध्दतीने लग्न केले. अजय देवगणने १९९१ मध्ये हिंदी चित्रपट फुल और काटे मधून आपल्या फिल्मी करियरला सुरूवात केली.

अजय देवगण एक उत्तम अभिनेता आहेतच पण त्याचबरोबर डायरेक्टर आणि प्रोडयुसर ही आहेत. आपल्या सुंदर अभिनयाने त्यांनी १०० पेक्षा अधिक चित्रपट केले आहेत. २ राष्ट्रीय फिल्म अवाॅर्ड आणि ४ फिल्मफेेयर अवाॅर्ड त्यांच्या नावे आहेत. २०१६ मध्ये भारत सरकारने त्यांना ४था सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्री ने सन्मानीतही केले आहे.

अजय देवगणचे सुपरहिट चित्रपट:

१९९१- फुल और काटे

१९९२- जिगर

१९९४- दिलवाले

१९९५- नाजायज

१९९६- दिलजले

१९९७- इश्क

१९९८- जख्म

१९९९- हम दिल दे चुके सनम

२०००- दिवानगी

२००३- दी लीजंड ऑफ भगतसिंग

२००४- गंगाजल

२००६- ओमकारा

२००७- गोलमाल: फन अनलिमीटेड

२००८- गोलमाल रिटन्र्स

२०१०- वन्स अपाॅन अ टाईम इन मंबई

२०१०- गोलमाल 3

२०१०- राजनीती

२०११- सिंघम

२०१२- बोलबच्चन

२०१२- सन ऑफ सरदार

२०१४- सिंघम रिटर्न्स

२०१५- दृश्यम

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *